आपण अशा स्पर्धात्मक जगात जगत आहोत जिथे उत्तम जीवन जगण्यासाठी निपुण असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक पालक आपल्या मुलाच्या चांगल्या भविष्याबद्दल आणि शिक्षणाबद्दल काळजी घेताच असतो. परंतु काहीवेळा सर्व प्रयत्न आणि परिश्रमानंतर आपल्या मुलास इच्छित परिणाम मिळत नाही. लक्ष केंद्रित न होणे, कमी बुद्धिमत्ता आणि विचलित एकाग्रता या सारख्या समस्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात थैमान घातले आहेत. या समस्या मुलांच्या बेडरूमच्या वास्तूमध्ये असू शकतात. मुलांच्या बेडरूम मध्ये वास्तुचा अवलंब करून, हे मुलांच्या जीवनातून नकारात्मक प्रभाव दूर करू शकतात.
या विश्वाच्या भोवती कॉस्मिक एनर्जी नावाची अदृश्य ऊर्जा आहे. ही ऊर्जा घरात सकारात्मक किंवा नकारात्मकतेचे एक कारण आहे. जर ही ऊर्जा असंतुलित असेल तर याचा आपल्या जीवनावर परिणाम नकारात्मक मार्गाने होतो तर संतुलित ऊर्जा सकारात्मक परिणामास कारणीभूत ठरते. सरळ वास्तुच्या माध्यमातून आम्ही आपल्या आसपास आणि आपल्या जवळ असलेल्या वैश्विक उर्जेला संतुलित करण्यासाठी उपाय प्रदान करू शकतो. गुरुजींनी २० वर्षांच्या सखोल संशोधनातून सरळ वास्तु तत्त्वे स्थापन केली. ही ३ तत्त्वे तीन वेगवेगळ्या नियमांद्वारे ऊर्जा संतुलनाबद्दल स्पष्टीकरण करतात. हे ३ नियम आहेतः
- दिशांसह ब्रह्मांडीय उर्जाशी कनेक्ट व्हा
- संरचनेसह ब्रह्मांडीय ऊर्जा संतुलित करा
- चक्राद्वारे ब्रह्मांडीय ऊर्जा चॅनेललाइझ करा
उत्तम दिशा, योग्य रचना आणि सक्रिय चक्रांसह आपण उर्जेचा समतोल साधू शकतो आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय कॉस्मिक उर्जेला मुक्त प्रवाह देऊ शकतो.
सरळ वास्तुमध्ये आम्ही तुमच्या जन्म तारखेचे विश्लेषण करुन या ऊर्जा संतुलित करण्यासाठी प्रभावी उपाय प्रदान करतो. गुरुजींच्या मते, “योग्य दिशा, रचना आणि चक्र यासारखे वास्तु समाधान एखाद्याच्या जन्माच्या तारखेवर आधारित असतात”. प्रत्येक व्यक्तीच्या चार अनुकूल आणि चार प्रतिकूल दिशा असतात. आपण आपल्या अनुकूल दिशेचे अनुसरण केल्यास आपण उत्कृष्ट परिणाम साध्य करू शकता आणि हे आपल्या जन्मतारीखानुसार निश्चित केले जाईल.
एका वडिलांनी शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी केली आहे परंतु त्यांच्या मुलास इच्छित परिणाम प्राप्त करण्यास यश येत नाही, कारण त्यांच्या भिन्न जन्मतारखेमुळे मुलांच्या बेडरूममध्ये स्वतंत्र वास्तू आवश्यक आहे.
योग्य वास्तु योग्य दिशा देण्यास मदत करते आणि मुलाला चांगले आरोग्य आणि बुद्धी मिळवून देते. तुम्ही मुलांच्या बेडरूमच्या वास्तुच्या टिपांचे अनुसरण करू शकता:
- सरळ वास्तु तज्ञांनी सुचविलेल्या मुलांसाठी सर्वात अनुकूल दिशांचे अनुसरण करा.
- मुलांचा अभ्यास कक्ष पसारामुक्त आणि नीटनेटका असावा.
- घराच्या पश्चिमेला मुलांची खोली बांधण्याचा प्रयत्न करा.
- मुलींसाठी, वायव्येकडे बांधणे चांगले आहे.
- मुलांसाठी, ते एकतर उत्तर किंवा पश्चिम दिशेला बांधले जावे.
- उर्जेच्या मुक्त प्रवाहासाठी खोलीचे केंद्रस्थान मोकळे ठेवा.
- दरवाजाच्या थेट समोर पलंग ठेवू नका. दारापासून येणारी प्रचंड ऊर्जा मुलाच्या एकाग्रतेवर अडथळा आणून शांतता भंग करते.
- पलंग नैऋत्य दिशेने ठेवला पाहिजे.
- अभ्यासाचे टेबल ईशान्य दिशेने ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
- मुलांच्या बेडरूमच्या वास्तुनुसार त्यांच्या खोलीचा रंग हा हलका रंग असावा.
- वास्तुनुसार, हिरवा रंग वापरण्याचा सल्ला सर्वात जास्त दिला जातो कारण यामुळे मुलामध्ये कार्यकुशलता वाढते. तसेच हा रंग शांतता, हिरवळ आणि ताजेपणाचे प्रतिनिधित्व देखील करते.
- बेड आणि भिंतींमध्ये काही इंचाचे अंतर असले पाहिजे.
- पुस्तके आणि शेल्फ् हे व्यवस्थितरित्या मांडून ठेवले पाहिजेत.
- मुलांच्या बेडरूममध्ये कोणताही आरसा ठेवू नका.
- मुलांच्या बेडरूममध्ये कधीही टीव्ही ठेवू नका.
- कपाट किंवा आलमारी दक्षिण किंवा पश्चिम दिशेने ठेवले पाहिजे.
- मुलांच्या खोलीत प्रेरणादायी सुविचार किंवा पोस्टर्स लावा.
- त्यांच्या शैक्षणिक हेतूसाठी लॅपटॉप आवश्यक असल्यास ते उत्तर दिशेने ठेवा.
- हवा खेळती राहील अशा खिडक्या आणि दारे व्यवस्थित जागी असाव्यात.
- अभ्यासाचे टेबल चौरस किंवा आयताकृती आकाराचे असावेत.
- तुळईच्या खाली विद्यार्थ्यांनी झोपू नये आणि बसू नये.
- मुलांच्या बेडरूममध्ये किंवा अभ्यासाच्या खोलीत शौचालयाचे दोन्हीही दरवाजे बंद ठेवा जर ते वेगळे असतील तर.
या मुलांच्या बेडरूमच्या २२ वास्तु टिप्समुळे विद्यार्थी त्यांचे लक्ष केंद्रित करू शकतात आणि चांगल्या निकालांसाठी त्यांची स्मरणशक्ती टिकवून ठेवू शकतात. ते चांगले वास्तुच्या मदतीने उत्कृष्ट कामगिरी करू शकतात आणि त्यांची कामगिरी वाढवू शकतात.