समृद्ध आणि तुमची संपत्ती वाढविण्यासाठी, तुम्हाला कठीण परिश्रम घेणे आवश्यक आहे. परंतु तुम्हाला सर्व स्तरातून व तुमच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीकडून नेहमी चांगले भाग्य आणि चांगल्या ऊर्जेची गरज आहे. तुम्ही किती कमाई करता आणि तुमच्या खर्चात किती कपात करत असाल तरीही तुमच्या घरात किंवा कार्यस्थळी एक छोटा वास्तुदोष तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणेल.
वित्तीय तज्ञांकडून सांगण्यात आलेल्या अनेक सूचना व सल्ले आहेत, जे तुमच्या खर्चात कपात करण्यास तुम्हाला मदत करतील, आणि सदर बचतीची रक्कम योग्य आर्थिक योजनांमध्ये गुंतवून त्यातून भविष्यात चांगल्या आर्थिक संपत्ती निर्मितीची अपेक्षा करता येते. पैसे बचत व वाढविण्याच्या नेहमीचे प्रयत्न आणि चाचणी पद्धतींव्यतिरिक्त वैकल्पिक पद्धत आहे जी आपल्या संपत्तीमध्ये वृद्धी करण्यास मदत करेल. – वास्तू शास्त्र.
एक योग्य वास्तू तुमच्या जीवनात बराच मोठा बदल घडवू शकते. यात तुमच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक समस्येचे समाधान आहे. तुमचे घर व कार्यस्थळ थेट तुमच्या जीवनावर प्रभाव पाडतात. या दोन ठिकाणांपैकी कुठलाही वास्तुदोष तुमच्या जीवनात परिणामकारक ठरेल. तिथेच तुमची समस्या सुरु होते आणि तिथेच तुम्हाला त्या समस्येवरील उपाय मिळतील. जर तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करण्यास सुरुवात झाली असेल, तर प्रमुख बदलांसाठी पुढे जाण्याअगोदर, तुमच्या घराची वास्तुची प्रथम तपासणी करा. तुमच्या घरासाठी एक योग्य वास्तु हे तुमचे भाग्य सुधारण्यासाठी व तुमच्या संपत्तीमध्ये वृद्धी आणण्यासाठीचे तुमचे पहिले पाऊल असू शकते.
संपत्ती मिळविण्यासाठी तुमच्या घराचे योगदान प्राफ्त होईल असे सर्वात सोपे 5 मार्ग:
- तिजोरीचे स्थान –
तुम्ही तुमची पैशाची तिजोरी कधीही बीमखाली ठेवू नका, कारण त्यामुळे आर्थिक चणचण निर्माण होते. प्राधान्याने तुमच्या लॉकरची दिशा ही कुबेरच्या दिशेनुसार म्हणजेच उत्तर दिशेने असावी. परंतु तुमच्या घराच्या स्थानानुसार व घरातील प्रमुख व्यक्तीच्या जन्मदिनांकाच्या आधारावर, तिजोरी विशिष्ट दिशेने ठेवावी.
- आरशाचे स्थान –
दुसरा उपाय म्हणजे तुमच्या तिजोरीसमोर एक आरसा ठेवा, ज्यात तुमच्या तिजोरीची प्रतिमा दिसेल. हे तुमचा पैसा दुफ्पट झाल्याचे प्रतीक आहे.
- एक मासेघर ठेवा व पक्षांना खाऊ घाला –
तुमच्या घरात एक मछलीघर (ऍक्वेरिअम) ठेवा. ते तुमच्या घरातील विविध वास्तूदोष सुधारण्यास मदत करते. सकारात्मक ऊर्जा प्राफ्त करण्यासाठी ऍक्वेरिअम स्वच्छ व हवायुक्त राहील हे निश्चित करा. सकारात्मक ऊर्जेच्या निर्मितीसाठी तुमच्या अंगणात पक्ष्यांना धान्य व पाणी देखील द्यावे.
- गळणाऱया नळाची दुरुस्ती –
तुटलेला किंवा गळणारा नळ हा तोटा किंवा पैशांच्या नासाडीचे प्रतीक आहे. म्हणून तुम्हाला पाण्याची व पैशांची नासाडी थांबविण्यासाठी लवकरात लवकर त्या नळांची दुरुस्ती किंवा तो बदलण्याची आवश्यकता आहे.
- मुख्य दरवाजा आकर्षक ठेवा –
वास्तुशास्त्रामध्ये मुख्य दरवाजाला महत्वाचे स्थान आहे. यातूनच संपत्तीसह अनेक गोष्टींचा प्रवेश व निर्गमन होते. तुमच्या जीवनात समृद्धी व संपत्ती सहजतेने आकर्षित होण्यासाठी तुमचा मुख्य दरवाजा सजविण्याची शिफारस केली जाते. वास्तुनुसार संपत्ती आकर्षित करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. कुटुंब प्रमुखाच्या शूभ दिशा व घराच्या स्थानासोबतच घरातील फर्निचर असलेल्या जागेच्या आधारे आणखी अनेक पद्धती आहेत. सरळ वास्तुमधील तज्ञ वैज्ञानिकदृष्टय़ा तुमची मदत करु शकतात आणि तुमच्या घराच्या माध्यमातून तुमची संपत्ती वाढविण्यात तुमची मदत करु शकतील असे अनेक मार्ग तुम्हाला सांगतील.