दिवाळी किंवा दिपावली हा या वर्षी 30 ऑक्टोबरला येणारा भारताचा सर्वात प्रमुख आणि प्रसिध्द सण आहे. दिपावली हा मंगल सण आहे जो आनंदात आणि उत्साहात सर्व जगभरात साजरा केला जातो. दिवाळीचा सण हा वाईटाचा चांगल्यावर विजय मिळणे आणि अज्ञानाचा अंधःकार संपवून ज्ञानाचा प्रकाश पसरविणारा आहे असे सूचित करतो. हा कॅलेन्डर वर्षातील प्रमुख हिंदू सणातील शेवटचा मोठा सण आहे व तो मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि सकारात्मकतेने साजरा केला जातो. तुमच्या घराला वास्तु अनुरूप करण्यासाठी साध्या दिवाळीचे वास्तु उपायांचे अनुकरण करण्याची 2017 ची दिवाळी हीच योग्य वेळ आहे. तुमचे घर ( किंवा कार्यालय ) हे वास्तु शास्राला अनुसरून असल्यामुळे तुमचे नशीब वृध्दिंगत होण्यास तसेच आनंद व समृध्दी याचा परिचय होऊन ते पूर्ण वर्षभर टिकविण्यात होतो.
दिवाळी वास्तुच्या उपायांचे योग्य प्रकारे अनुसरण केल्याने सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करते व नकारात्मक ऊर्जेला घरापासून दूर ठेवण्याची खात्री मिळते. तुमच्या घराला वास्तु अनुरूप करण्यासाठी जेव्हा सणासुदीच्या हंगामातील उपायांबद्दल बोलले जाते तेव्हा दिवाळीची वेळ सर्वोत्तम आहे ज्यामध्ये दिवाळीसाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो त्या वास्तु शास्राचाच एक भाग आहे हे खरे आहे. उदाहरणार्थ, दिवाळीच्या वेळी प्रत्येक घर चकचकीत स्वच्छ केले जाते. वास्तु अधिकारवाणीने सांगते की मुक्त ऊर्जेच्या प्रवाहासाठी घराचा परिसर स्वच्छ व व्यवस्थित असावा. दिवाळीमध्ये घरात ताजी फुले व सुवासिक उदबत्त्या लावल्या जात असत असे वास्तु पुराणात उल्लेख आहे आणि सुवासिक उदबत्त्या लावल्याने आतून सकारात्मक ऊर्जेची जाणीव होते.
2017 च्या दिवाळीसाठी वास्तुच्या टिपा –
वास्तुच्या टिपांचे लोकांनी अनुसरण करण्यासाठी दिवाळीसारख्या मंगलमय सणाच्या वेळेस लोकांच्या घर व कार्यालयातील वास्तुला सुधारण्यासाठी काही सरळ आणि साधे उपाय दिले आहेत –
खिडक्यांची कसून स्वच्छता करणे – या दिवाळीत सुनिश्चित करा की तुमच्या घराच्या खिडक्या ह्या शीळ घातल्याप्रमाणे स्वच्छ असाव्यात. दिवाळीच्या दंतकथांप्रमाणे देवी लक्ष्मी तुमचे घर आतून बघण्याची अनुमती घेते. वास्तु शास्राप्रमाणे स्वच्छ खिडक्यांमुळे अंधःकार ( उदासीनता ) नष्ट होतो आणि स्वच्छ सूर्यप्रकाश तुमच्या घरात येऊन सकारात्मकतेमध्ये वाढ होते.
मुख्य प्रवेशद्वार किंवा मुख्य द्वारास सुशोभित करणे – दिवाळीला मुख्य द्वाराची सजावट करण्याने संपत्तीची देवता देवी लक्ष्मीला आमंत्रण दिले जाते. स्वच्छ आणि साफ प्रवेशद्वार वास्तु अनुसार सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सूचित करतो. कार्यालयाचे प्रवेशद्वार सुशोभित केल्यास अधिक व्यापार आकर्षित होतो.
घराला रंग लावणे – काही लोक सणांच्या दिवसात आपल्या घरांना रंग लावतात. असे म्हटले जाते की यामुळे सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. वास्तु प्रमाणे घरातील काही खोल्यांच्या भिंतीना रंग लावा उदाहरणार्थ, असे म्हटले जाते की लहान मुलांच्या खोलीच्या भिंती हिरव्या रंगाने आणि झोपायच्या खोलीतील भिंतीला निळा रंग असावा. तथापि, प्रत्येक माणसाप्रमाणे आणि प्रत्येक जागेप्रमाणे रंगांच्या छटा बदलत जातात.
प्रकाशयोजना – दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, असा दिवस ज्यामध्ये प्रकाश अंधारावर विजय मिळवितो. दिवाळीमध्ये घरात विशिष्ट रंगांचे दिवे विशिष्ट दिशांना लावून सुशोभित करावे. दिव्यांच्या दिशा वास्तुनुसार बदलल्या जाऊ शकतात. वास्तु शास्राप्रमाणे उत्तम प्रकारे प्रकाशित घर हे संपत्ती व समृध्दीला आकर्षित करते.
खरेदी – दिवाळी सणाच्या दिवशी, दुकाने व स्टोअर्स त्यांच्या उत्पादनांवर प्रचंड सवलती देतात. लोक वर्षातील या सणाच्या वेळेस मोठ्या प्रमाणात खरेदी करून प्रचंड खर्च करतात. कपडे आणि आकर्षक वस्तूंसोबत सैंधव मीठ, दिवे, प्रभारीत केलेली यंत्रे इत्यादी वास्तु संबंधित उत्पादनेसुध्दा खरेदी करण्याचे सुनिश्चित करा.
वास्तु शास्र व्यापक आहे म्हणून योग्य वास्तु सल्लागार सेवा निवडणे खूप महत्त्वाचे असते. सरळ वास्तुमध्ये आम्ही तुम्हाला सर्वोत्तम व विशिष्ट प्रकारे निर्मित केलेल्या तुमच्या गरजेप्रमाणे तसेच स्थानानुसार सेवा पुरवितो.