भारतातील सर्वात मोठ्या आणि अतिशय महत्त्वाच्या सणाची संपूर्ण वर्षात मिळणारी सुट्टी म्हणजे दिवाळी, आता अगदी जवळ आली आहे. व्यक्ती, कुटुंब आणि उद्योग समूहांनी ही दिवाळी स्मरणीय बनविण्यासाठी दिवाळीच्या तयारीला सुरूवात केली आहे. दिवाळीचा पहिला दिवस आहे म्हणजेच 17 ऑक्टोबरला असलेली धनत्रयोदशी तसेच 19 ऑक्टोबरला आहे लक्ष्मीपूजन. लोकांनी आधीच समृध्दी व एैश्वर्याचा प्रवेश होण्यासाठी घर आणि कार्यालयाची सजावट करण्यास सुरूवात केली आहे. बऱ्याच लोकांसाठी दिवाळी हा सुखकारक देवी लक्ष्मीचा सण आहे आणि तिच्या आशिर्वादानेच त्यांच्या घरी किंवा व्यवसायात संपत्तीला म्हणजेच लक्ष्मीला निमंत्रित केले जाते. धन आणि भाग्याला आकर्षित करण्याची सुप्रसिध्द कार्यपध्दती म्हणजे संपत्तीसाठी वास्तु ही संकल्पना आहे. कोणत्याही घरात जेव्हा वास्तु शास्र योग्य प्रकारे कार्यान्वित केले जाते तेव्हा फक्त संपत्तीच नाही तर आरोग्य, समृध्दी व एकंदर क्षेम खुशालीला आकर्षित केले जाते. संपूर्ण वर्षभर सकारात्मक व्हाइब्जना आकर्षित करण्यासाठी घर आणि कार्यालयाला सुशोभित करताना वास्तु सिध्दांतांविषयी जागरूक असणे आवश्यक आहे.
तिजोरीसाठी जागा, महत्त्वाची कागदपत्रे ठेवण्यासाठीची खोली, शेतजमीन आणि इमारतींची संरचना, जलाशयांचे बांधकाम याविषयी संपत्तीसाठी वास्तु आदर्श स्थान निर्धारित करते. घर आणि शेतजमीन यांना एकत्र जोडून वर सांगितल्याप्रमाणे केल्यावर संपत्ती व भाग्याला आकर्षित करता येते. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे आणि यावेळी घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवून दिव्यांनी चांगला प्रकाशित केला जातो. दिवाळी ही देखील स्वतःमधील प्रकाशाविषयी ( ऊर्जेविषयी ) जाणीव करून घेण्याची वेळ असते. वास्तु शास्र आजूबाजूच्या परिसराबरोबर तालमेल ठेवून व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या अंतस्थ शक्तींचा मागोवा घेण्यास मदत करते. दिवाळी 2017 मध्ये पुढील वास्तु संकल्पनांप्रमाणे घर किंवा कार्यालयाची सजावट करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे.
वास्तु शास्राच्या ऑनलाईन भरपूर टिपा उपलब्ध आहेत पण जास्तीत जास्त लाभ प्राप्त करण्यासाठी घर किंवा कार्यालयाची सजावट करताना वास्तु तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्य़क आहे. वास्तु प्रमाणे तुमचे घर सजविण्यासाठी कोणते साधारण उपाय करावेत आणि कोणते करू नयेत ते खाली दिले आहेत –
वास्तु सजावटी साठी हे करावे –
1) वास्तु अनुसार असलेल्या घरांमध्ये संपत्ती आकर्षित होते. ह्या दिवाळीत तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर पसारा न ठेवता ते व्यवस्थित ठेवून प्रवेशद्वार सजवा.
2) मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे उघडणारे असावे. यामुळे समाधान आणि समृध्दीला निमंत्रण मिळते. दिवाळीमध्ये मुख्य प्रवेशद्वाराने देवी लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण केले जाते.
3) घरात किंवा कार्यालयात मनीप्लांट लावा. मनीप्लांटला इमारतीच्या वास्तुप्रमाणे स्थित करा.
4) जांभळा रंग हा संपत्तीचा रंग आहे म्हणून मनीप्लांट नेहमी जांभळ्या रंगाच्या कुंडीमध्ये किंवा फुलदाणीत लावावे असा सल्ला दिला जातो.
5) घराचे मुख्य प्रवेशद्वार योग्य साहित्याने सजविणे गरजेचे आहे. ताजी फुले टांगून जुनी झालेली व कुजलेली फुले नियमितपणे बदलून टाकाणे किंवा काढून टाकणे आवश्यक आहे.
6) नंबर प्लेट आणि घराच्या मालकाच्या नावाची पाटी ही स्वच्छ आणि चकचकीत असावी.
वास्तु सजावटी साठी हे करू नये –
1) घरात किंवा कार्यालयात तिजोरी बीमच्या खाली ठेवू नका. त्यामुळे नकारात्मकता आकर्षित होते आणि त्यामुळे समृध्दीच्या प्रवाहात विपरित प्रभाव पडतो.
2) असा विश्वास आहे की घरातील संपत्ती आणि आरोग्याच्या प्रवेशाच्या मार्गात अस्वच्छतेमुळे अडथळे निर्माण होतात. घर विशेषतः दारे स्वच्छ असतील याची खात्री करा.
3) स्वच्छ असलेल्या खिडक्या या मोकळेपणा आणि ऊर्जेचा प्रवाहाचे द्योतक आहेत.
4) घरात किंवा कार्यालयात नादुरूस्त, गळणारे नळ, तोट्या नसाव्यात. गळणारे पाणी संपत्तीचे नुकसान दर्शवितात आणि म्हणूनच असे नळ बदलणे किंवा दुरूस्त करणे महत्त्वाचे आहे.
5) घराच्या भिंतींना गडद रंग लावू नका.
6) जर कोणतेही मागच्या वर्षांचे दिनदर्शिका ( कॅलेन्डर ) असतील तर त्या काढून टाका. जुनी पुस्तके, जुने कागद किंवा कोणतेही नको असलेले सामान तुमच्या घरातून काढून टाका कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.
दिवाळीत तुमचे घर सजविण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या कारण वास्तु सल्लागार तुम्हाला वास्तुप्रमाणे असणारे घर बनविण्यासाठी आदर्श उपाय सुचवितात. जेव्हा तुमचे निवासस्थान वास्तु अनुरूप परिपूर्ण असते तेव्हा तेथील निवासी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तसेच सुख आणि समृध्दीच्या अनुभवाचे साक्षीदार असतात.