देवी देवतांची उपासना करण्यासाठी, विविध ग्रहांची शांती करण्यासाठी आणि उत्तम वास्तुचे पर्याय निवडण्यासाठी दिवाळीचा सण संपूर्ण वर्षभरात ही सर्वोत्तम वेळ आहे. दिवाळीचा सण हा एक नेत्रदीपक सण असून उज्ज्वल दिवे, नवीन कपडे, स्वादिष्ट गोड पदार्थ आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हसतमुख चेहर््यांनी देशभरात तो साजरा केला जातो. ही वर्षातील अशी वेळ आहे जिथे तुमच्या आसपासच्या सकारात्मक ऊर्जेचा पूर्णपणे उपयोग करावा लागतो व आपल्या फायद्यासाठी त्याचा वापर केला जातो. दिवाळीच्या पूर्वीचा हा शेवटचा आठवडा असल्याने बहुतेक लोकांनी आपली घरे स्वच्छ ठेवण्यासाठी घराच्या साफसफाईला सुरूवातही केली असेल. परंतु या दिवाळीत ` दिवाळीसाठी ‘ वास्तु शास्राच्या काही टिपांचे अनुसरण करून तुमचे घर स्वच्छ करा आणि घरातील फर्निचर आकर्षकपणे लावा / पुर्नमांडणी करा.
वास्तु शास्र हे असे शास्र आहे जिथे भोवतालच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहाला एकत्र जमविले जाते आणि त्याचा आपल्या फायद्यासाठी उपयोग केला जातो. दिवाळी हा आनंदाचा आणि दिव्यांचा उत्सव असल्याने अनेक वास्तु शास्राच्या तत्त्वांचे पालन केले जाते. उदाहरणार्थ, दिवाळीत तेलांचे दिवे लावण्याची प्रथा आहे पण त्याची जागा आणि दिशा ही वास्तु शास्राअंतर्गत येतात. दिवाळीत घर सजविण्यापूर्वी वास्तु शास्राच्या टिप्स समजावून घेणे अत्यावश्यक आहे.
दिवाळीचा मुख्य दिवस म्हणून लक्ष्मी पूजनाचा दिवस हा विशेष समजला जातो. या दिवशी धनलक्ष्मीला आवाहन केले जाते. या दिवशी देवी लक्ष्मी तृप्त होऊन संपूर्ण घराला धन, भाग्य आणि समृध्दीचा आशिर्वाद देते. म्हणून देवी लक्ष्मीची पूजा यथासांग व काटेकोरपणे करणे महत्त्वाचे असते. वास्तु
शास्राप्रमाणे पूजेच्या खोलीची सजावट केल्याने देवी प्रसन्न होते व भक्तांना संपत्ती आणि समृध्दीचा आशिर्वाद देते. तथापि वास्तुमध्ये असे बरेच नियम आहेत जे प्रत्येक व्यक्तीनुसार तसेच घराची जागा आणि दिशेनुसारही बदलत जातात. त्यामुळे घरासाठी वास्तु सल्लागाराला संपर्क करणे जरूरीचे आहे आणि त्यानुसार घरात आवश्यक ते बदल करून घेतले पाहिजेत.
भोवतालचा परिसर –
- मोकळ्या जागांमुळे मुक्त ऊर्जेचा प्रवाह प्राप्त होतो. तुमच्या घराबाहेरचा परिसर समतोल ऊर्जा प्रवाहासाठी पसारा मुक्त म्हणजेच नीटनेटके, व्यवस्थित तसेच स्वच्छ असणे आवश्यक आहे.
- घराचा कोणताही कोपरा अंधारात असू नये. घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात व आजूबाजूच्या परिसरात दिवे लावून प्रज्वलित करा.
- मुख्य प्रवेशद्वाराच्या किंवा प्रवेशद्वाराचे गेट समोरील क्षेत्र स्वच्छ असावे. घर आणि आसपासच्या स्वच्छ परिसरातून संपत्तीची देवी लक्ष्मी प्रवेश करते.
मुख्य द्वार अथवा प्रवेश द्वार –
- मुख्य द्वार अथवा प्रवेशद्वाराचे गेट स्वच्छ ( अथवा रंगविलेले देखील चालेल ) असावे. मुख्य द्वार अथवा प्रवेशद्वाचे गेट कोणत्याही प्रकारे करकर असा आवाज करणारे असू नये.
- मुख्य दरवाजावर तोरण लावावे. तसेच येथे अष्टमंगलाचे चिन्ह ठेवू शकतो. प्रमुख प्रवेशद्वारावर अभद्र शक्तींना दूर ठेवण्यासाठी चांदीचे स्वस्तिक स्थापित करावे.
- छोटे पावलांचे ठसे घराच्या बाहेर लावावे. पावलांचे ठसे घराच्या आतल्या दिशेने जाताना लावावे. हे पावलांचे ठसे म्हणजे देवी लक्ष्मी याच पावलांनी तुमच्या घरी प्रवेश करते असे संबोधले जाते.
घराच्या आतमध्ये –
- पाण्याने भरलेल्या भांड्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकाव्यात. सजावटी उद्देश्या व्यतिरिक्त असे केल्याने घराच्या मालकाला समृध्दी प्राप्त होते.
- ओम, स्वस्तिक इत्यादी चिन्हे घरातील अमुक एका भिंतीवर लावावी.
- संपूर्ण घराला समृध्दी मिळण्यासाठी रांगोळीच्या आजूबाजूला सगळीकडे ( किंवा रांगोळीच्या मध्यभागी ) मातीचे दिवे लावा.
वास्तु भेटी –
- दिवाळीला परिवारातील सदस्यांना भेटी देतात आणि घरासाठी काही तरी नवीन खरेदी करतात. या दिवाळीला वास्तु भेटी खरेदी करण्याचा विचार पक्का करा.
- वास्तु चित्रे ( पेंटिंग्ज ) लोकांना भेट म्हणून देऊ शकतो व ती पेंटिग्ज घरामध्ये एका विशिष्ट दिशेतच टांगली गेली पाहिजेत.
- तुमच्या प्रियजनांना कातड्याच्या ( लेदर ) आणि पुरातन ( अॅन्टीक ) वस्तू भेट म्हणून देऊ नये.
- तुमच्या घरासाठी यंत्र ही सर्वोत्तम भेट ठरू शकते.
दिवाळीचा दिवस –
- प्रमुख द्वाराच्या दोन्ही बाजूला तेलाचे दिवे लावून ठेवावे.
- मुख्य द्वाराच्या बाहेर लावलेले दिवे नेहमी चारच्या पटीत असले पाहिजेत.
- गंगाजळाचे शुध्द पाणी भांड्यात किंवा ट्रे मध्ये घेऊन ते घराच्या मध्यभागी ठेवा. त्यात फुलांच्या पाकळ्या टाकून तरंगणारी मेणबत्ती त्याच्या मध्यभागी ठेवा. यामुळे घरात सकारात्मकता येते.
वास्तुचे सल्लागार घरामध्ये तुम्हाला पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिशा आणि वास्तुच्या वस्तू ठेवण्यासाठी असलेली योग्य जागा ओळखण्यास मदत करतात. ते तुम्हाला फर्निचर व पेंटिंग्ज ठेवण्यासाठीची जागा सुध्दा सुचवतील. तुम्हाला वास्तु अनुकूल व वास्तु मैत्रीपूर्ण ( वास्तु फ्रेंडली ) अशा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !