स्वाधिष्ठान चक्र ( याला धार्मिक चक्र अथवा उदर चक्र असेही म्हणतात. ) मानवी शरीरातील दूसरे प्राथमिक चक्र आहे. ` स्वा ‘ शब्दाचा अर्थ स्वयं आणि ` स्थान ‘ म्हणजे ठिकाण असा आहे. स्वाधिष्ठान चक्र ही अशी जागा आहे जेथे मानवी जाणीव चालू होते आणि हा मानवी विकासाचा दूसरा टप्पा आहे. असे सांगितले जाते की स्वाधिष्ठान चक्र हे मनाचे निवासस्थान आहे किंवा सुप्त मनासाठी घर असते. गर्भाशयामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर जीवनातील सर्व अनुभव व आठवणी येथे साठविल्या जातात. हे चक्र नकारात्मक लक्षणांची जाणीव झाल्यावर त्या नष्ट करून व्यक्तिमत्वाचा विकास झालेला स्पष्ट करतो.
ह्या चक्राच्या कमळासह सहा पाकळ्या प्रतिकात्मक रित्या दर्शविल्या जातात ज्यामध्ये प्रत्येक पाकळी सहा नकारात्मक लक्षणांचे प्रतिनिधित्व करते. स्वाधिनता चक्राचे तत्त्व जल आहे आणि त्याचा रंग नारिंगी आहे. त्याचा मंत्र ` वाम ‘ आहे.