विशुध्द चक्र ( त्याला विशुध्दी चक्र अथवा कंठ चक्र म्हणून ओळखले जाते. ) मानवी शरीरातील है पाचवे प्राथमिक चक्र आहे. विशुध्द हा संस्कृत शब्द आहे ज्याच्या अर्थ आहे शुध्द करणे अथवा स्वच्छ करणे आणि ही स्वच्छता फक्त शारीरिक स्तरावर नसून आत्मा आणि मनाची सुध्दा असल्याचे दर्शविते. आत्म्यातून सत्य व्यक्त करणे हाच याचा मुख्य उद्देश आहे. हे चक्र दळणवळण तसेच वक्तव्याचे केंद्र आहे आणि श्रवण शक्ति व ऐकणे या गोष्टी कंठ चक्राने नियंत्रित केल्या जातात. यामुळे व्यक्तीला संवाद करण्याचा तसेच निवड करण्याचा अधिकार मिळतो.
प्रतिकात्मक रूपात हे चक्र कमळाच्या सोळा पाकळ्यांनी दर्शविले जाते ज्यामध्ये प्रत्येक पाकळी ही व्यक्तीला संभवतः श्रेष्ठत्व प्राप्त होऊ शकते अशा सोळा वैशिष्ट्यांचे प्रतिनिधित्व करते. ( सोळा पाकळ्या ह्या संस्कृतच्या सोळा स्वरांचे प्रतिनिधित्व करतात. ) याचा मंत्र ` हम ‘ आणि रंग निळा आहे.