मणिपूर चक्राला सौर पेशींचे चक्र किंवा नाभी चक्र म्हणून ओळखले जाते आणि मानवी शरीरातील हे तिसरे प्राथमिक चक्र आहे. ` मणि ‘ चा अर्थ ` मोती ‘ आहे व ` पूरा ‘ म्हणजे ` शहर ‘ आणि मणिपुरचा अर्थ आहे ज्ञानाचे मोती. ( याचा अजून एक अर्थ आहे लुकलुकणारे रत्न आणि हे बुध्दि तसेच आरोग्याशी संबंधित आहे, ) आत्म विश्वास आणि आत्म आश्वासन, आनंद, विचारांची स्पष्टता, ज्ञान तसेच बुध्दि आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता हे रत्न व मोती या चक्रात समाविष्ट आहेत. हे चक्र चेतनेचा केंद्रबिंदू मानले जाते ज्यामुळे शरीराच्या आतील ऊर्जेचे संतुलन होते. मणिपूर चक्र इच्छाशक्तीला नियंत्रित करते तसेच स्वतःसाठी आणि दुसर््यांबद्दलचा आदर मनामध्ये बिंबविते.

मणिपूर चक्रा प्रतिकात्मकरित्या कमळाच्या फुलाबरोबर दहा पाकळ्यांनी दर्शविले जाते जे सूचित करते की दहा पाकळ्या या दहा अत्यावश्यक महत्त्वपूर्ण शक्ती आहेत ज्या आरोग्याची देखरेख करते तसेच त्याला मजबूत बनविते. मणिपूर चक्र खाली इशारा करणा र््या त्रिकोणाने दर्शविला जातो जो सकारात्मक ऊर्जेच्या विस्ताराला सूचित करतो. हे चक्र अग्नि तत्त्वाने तसेच पिवळ्या रंगाने दर्शविले जाते. पिवळा रंग ऊर्जा तसेच बुध्दिला सूचित करतो.

मणिपुर चक्राचे स्थान –

हे चक्र नाभीच्या केंद्रस्थानी बरगड्यांच्या खाली स्थित असते.

मणिपुर चक्राशी संबंधित अवयव आणि आजार –

मणिपूर चक्र मुख्यतः स्वादुपिंड तसेच पचन प्रणालीच्या कार्यपध्दतीला संचालित करते. ( जेथे अन्नाचे ऊर्जेत रूपांतर होते ) हे पोट, यकृत, आणि मोठे आतडे यांना नियंत्रित करतो.

मणिपूर चक्राच्या असंतुलित होण्यामुळे पचनासंबंधी विकार, अजीर्ण, मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्तातील साखर कमी होणारा आजार ( हायपोग्लासीमिया ), अल्सर, रक्ताभिसरणाचे रोग तसेच अन्न उत्तेजकांचे व्यसन अशा प्रकारच्या शारिरीक समस्यांचे कारण होऊ शकते. थकवा किंवा अधिक सक्रिय होणे तसेच भित्रेपणा असणे किंवा रागीट स्वभाव होणे अशा प्रकारच्या भावनिक समस्या निर्माण होतात.

अवरूध्द तसेच असंतुलित मणिपूर चक्रामुळे होणाऱ्या समस्या –
  • अति सक्रिय मणिपूर चक्र –
    ज्यांचे तृतीय चक्र अति सक्रिय होते तेव्हा व्यक्ती तापट व आग्रही स्वभावाच्या होतात तसेच त्या अधिक उत्साहपूर्ण असतात आणि याला नियंत्रित करणे अति आवश्यक असते. त्यांचा स्वभाव दुसर्यांबद्दल मतप्रदर्शन करणारा आणि पटकन राग येणारा असू शकतो. वरिष्ठ अधिकारी जर अति सक्रिय चक्राचे असतील तर ते कामसू असतात व धाकदपटशाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर नियंत्रण करतात.
  • निम्न सक्रिय मणिपूर चक्र –
    निम्न सक्रिय मणिपूर चक्र असलेल्या लोकांमध्ये आत्मविश्वास, आत्मसन्मानाची कमतरता असते तसेच त्यांना भावनात्मक समस्या असतात. त्यांचा स्वभाव भित्रा तसेच सहज घाबरणारा व अशांत असतो आणि त्यांना अयशस्वी होण्याची भीती असते म्हणून प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांना दुसऱ्यांचा सल्ला घ्यावा लागतो. कोणताही निर्णय घेताना ते भिडस्त असतात आणि त्यांना असुरक्षिततेची भावना असते.
संतुलित मणिपूर चक्राचे फायदे –

संतुलित मणिपूर चक्राच्या व्यक्ती खंबीर तसेच आत्मविश्वासपूर्ण असतात आणि स्वतःच्या ध्येयांना पूर्ण करण्यासाठी आरामदायक सुखी जीवनाचा त्याग करतात. ह्या व्यक्ती स्वतःवरं व दुसऱ्यांवर प्रेम करतात तसेच त्यांचा आदरही करतात व त्यांच्यात चांगले नेतृत्त्व गुण असतात.

मणिपुर चक्राला उघडणे –
    • मणिपूर चक्राला उघडण्यासाठी नाभी क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले पाहिजे व पिवळ्या रंगाचे मूळ नाभीतून होते अशी कल्पना केली पाहिजे. पिवळ्या रंगाचे कपडे घालावे किंवा ध्यानधारणा पिवळ्या रंगाच्या खोलीत बसून करावी. या चक्राला सूर्याच्या प्रकाशात प्रभारित केले जाऊ शकते.
    • उस्त्त्रासन ( अथवा उंटाची मुद्रा ), भुजंगासन ( अथवा सापाची ( भुजंगाची ) मुद्रा ) आणि बितीलासन ( अथवा गायीची मुद्रा ) अशा योगासनांमुळे मणिपूर चक्र सक्रिय होऊ शकतो.
    • नींबू किंवा सिट्रोनेला सारख्या आवश्यक तेलांना विशिष्ट जागी लावल्याने मणिपूर चक्र सक्रिय होते.
    • घराला वास्तु अनुरूप बनविणे आणि झोपताना, अभ्यास करताना, कामे करताना इत्यादी वेळेस चक्रांना सक्रिय करण्यासाठी दिशांच्या विज्ञानाचे अनुकरण केले पाहिजे.
    • नाच, खेळ, व्यायाम इत्यादीसारख्या शारीरिक आणि उत्साहपूर्ण उपक्रमांच्या माध्यमांमुळे या चक्राला उघडले जाऊ शकते.
    • पिवळ्या रंगाच्या रत्नांना तसेच पिवळ्या रंगांचे क्रिस्टल्स परिधान करणे ही चक्र उघडण्याची पध्दत आहे. यामध्ये पिवळा सिट्रीन, पुष्कराज इत्यादी रत्नांचा समावेश होतो.
    • सूर्यफुलाचे बी, शेवंती, हळद इत्यादी पिवळ्या रंगाच्या खाद्य पदार्थांमुळे सौर पेशी चक्र संतुलित होते.