गुढीपाडवा हा मराठी शब्द आहे, शब्द “पाडवा” हा संस्कृत शब्द “पतिप्रदा” या शब्दापासून आला आहे. आणि हा एक वसंतोत्सव आहे. जो भारताच्या बऱ्याच भागात हिंदूंचे नववर्ष म्हणून साजरा होतो . हा उत्सव भारतातील कर्नाटकात युगडी, आंध्र प्रदेशातील उगाडी, काश्मीर पंडितांमध्ये नवरेह आणि सिंधी यांनी चेटी चंड म्हणून साजरा केला जातो.
चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढीपाडवा) हा महोत्सव १८ मार्च २०१८ रोजी येत आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्यांतहि हा सण उत्साहाने साजरा करतात. गुढी पाडव्याचा महात्म म्हणजे , ब्रह्मा पुराणात उल्लेख केल्याप्रमाणे , भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी महाप्रलयानंतर विश्वाची निर्मिती केली.
गुढी पाडव्याच्या महत्त्व संबंधित आणखी एक पौराणिक महत्त्व आहे,ते म्हणजे रावणा वर भगवान श्रीरामांचा विजय याचे प्रतीक आहे आणि राम राज्याभिषेकाचा निमित्त आहे. गुढीपाडव्याच्या या शुभ प्रसंगी, सर्व महाराष्ट्राच्या घराच्या समोर बांबू , कडुलिंबाची पाने आणि लाल हार घालून गुढी उभारतात . मुळात, गुढीला रेशम कापडाने गुंडाळले जाते जे लाल आणि पिवळ्या रंगाचे असते, हे रंग समृद्धीचे प्रतीक आहे. गुढीची सजावट घराच्या आत, खिडकीच्या बाहेर किंवा मुख्य दारावर असते. हे , सुख आणि शांती चे प्रतीक आहे.
या विशेष दिवशी लोक लवकर उठतात, पवित्र स्नान करून नवीन पोशाख घालतात. घरांची साफसफाई केली जाते आणि काही भागात तर घराच्या अंगणात सडा रांगोळी काढली जाते . आकर्षक रंगोळी ही मुख्य दाराच्या समोर वसंत ऋतुचे स्वागत करण्यासाठी असते.
इतर कोणत्याही उत्सवाप्रमाणेच, हा सणही अधिक महत्वाचा आहे. गुढी पाडव्या निमित्त चविष्ट पदार्थ म्हणजेच “पुरण पोळी ” आणि “श्रीखंड” ज्यामुळे या उत्सवाचा आनंद द्विगुणित होतो . भारतातील इतर राज्यांमध्ये, पुरण पोळी सारखे इतर गोड खाद्यपदार्थ तयार होतात. कर्नाटकात ‘ओबबत्तु’ नावाचा पदार्थ आणि आंध्र प्रदेशमध्ये ‘बॉबट्टू’ नावाचा पदार्थ केला जातो.
सर्वाना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!