वास्तु या शब्दाचा मूळ अर्थ सोडून लोक घाबरण्याइतपत लिहिले गेले. म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे घर नसेल तर त्या घरात मृत्यू निस्चित आहे असे लिहिले. वास्तू व मृत्यूचे साम्य दाखवले गेले. माणसाला अंतिम भय मृत्यूचे असते. या प्रकाराने माणूस आणखी भयभीत झाला. लेखनालाही एक सीमा नसलेले, पण ती सीमा ओलांडून काहीही लिहिले. या काळात वास्तु हा शब्द घराघरात पोहचला. एवढेच नव्हे, घरातील छोट्या मुलालाही वास्तु हा शब्द ओळखीचा झाला. आजकाल प्रत्येक घरात एक वास्तुपंडित आहेत म्हटले तर ओळखीचा होणार नाही. आजच्या प्रचलित वास्तुशास्त्राप्रमाणे आग्नेय दिशेला स्वयंपाकघर, ईशान्य दिशेला देवघर, नैऋत्य दिशेला घरच्या यजमानाचे शयनगृह, उत्तर किंवा पूर्व दिशेला घरचा मुख्य दरवाजा, ईशान्य दिशेला शौचालय नसावे, ईशान्य दिशेला बोअरवेल असावी या प्रकाराने तुमचे घर बांधले तर ते शास्त्रोक्त घर…. नाही तर ते वास्तुशास्त्रप्रमाणे घर नव्हे असे लिहिले गेले.
तीस- चाळीस वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी बांधलेल्या ९०% घरांमध्ये आग्नेय दिशेला स्वयंपाक घर, ईशान्य दिशेला देवघर, पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख्य दरवाजा वगैरे वास्तुशास्त्राच्या पुस्तकांमध्ये लिहिलेला तपशील नसायचा हे लक्षात घ्या. म्हणून काय ते सारे सुखात नव्हते का? हे कोणी वेगळे सांगायला नको. थोडा विचार केला तर तुमच्या डोÈयासमोर स्पष्ट चित्र उभे राहील.
आपल्या पूर्वजांना ७०-८० वय झाले तरी मधुमेह, रक्तदाब हे माहित नव्हते. आता आपण २०-३० वर्षालाच चहात साखर नको म्हणायला लागलो आहोत. आपले पूर्वज सुखी होते की नवे वास्तुशास्त्र अंमलात आणणारे आपण सुखी आहोत? याचा विचार तुम्हीच करा.
मग खरे वास्तुशास्त्र म्हणजे काय? “माणूस सभोवतालच्या वातावरणाशी समरस होऊन जगण्याची कला” असे म्हणता येईल. ती कोणाच्याही जन्म- मृत्यूशी संबंधित नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही जाती व धर्माशी निगडित नाही. आणखी एक विशेष म्हणजे घर किंवा कामाची जागा स्वत:च्या मालकीचीच असायला पाहिजे अशी काही अट नाही. भाड्याच्या जागेतही वास्तुशास्त्र अंमलात आणता येते. खरोखर आता प्रत्येकाने विचार करण्याची वेU आली आहे. आतापर्यंत देशाच्या बर्याच भाषांमध्ये लिहिलेल्या वास्तुशास्त्रच्या पुस्तकांनी लोकांना चुकीच्या मार्गाला ओढले आहे. एवढेच नव्हे तर वास्तुच्या नावाखाली अनेक लोकांनी खूप पैसा गमावला आहे. त्यांनी केलेल्या चुका कोणत्या हे पुढच्या भागात सविस्तर सांगतो.