आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक माणसाला चार चांगल्या दिशा आणि चार वाईट दिशा असतात. आपल्या बाबतीत ईशान्यदिशा चार वाईट डिशमध्ये आली असेल तर त्याचा वाईट परिणाम होत नाही. चांगलाच परिणाम होईल. हे वाचून आपल्याला आश्चर्य वाटेल परंतू हे सर्वकालीन सत्य आहे.
याचे एक उदाहरण द्यायचे झाले तर गदग मान्वी राहातात त्या घराचे देता येईल. आणखीन एक उदाहरण हवे असेल तर नवी मुंबईत मी राहातो त्या घराचेच देता येईल. आमच्या घराच्या ईशान्य दिशेलाच शौचालय आहे. मी हे घर २००० साली घेतले आहे. जेव्हापासून मी या घरात राहू लागलो तेव्हापासून मी आनंदात आहे. शिवाय या घरात राहायला आल्यानंतरच मला सरलवस्तूबद्धल अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ईशान्य दिशा ही माज्या चार वाईट दिशांपैकी एक आहे हेच याचे मूळ कारण आहे त्याचप्रमाणे जर ईशान्य दिशा ही चार चांगल्या लाभदायक दिशांपैकी एक असेल आणि त्या दिशेलाशौचालय असेल तर मग काय करायचे? हा प्रश्न उद्भवतो. एक वेळ ईशान्य दिशा चार चांगल्या दिशांपैकी असून तेथे शौचालय असेल तर. त्यामुळे त्यांना चांगले फळ मिळणार नाही. परंतु वास्तुपंडितांनी लिहिल्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूचे निमित्त होणार नाही. शौचालय तोडून का टाकायचे? खरोखर त्यांने काय घडते? मी सांगितल्याप्रमाणे शौचालयात ऋणात्मक शक्ति उत्पन्न होते. शौचालय आपण वापरतो तेव्हाच ऋणात्मक शक्ती उत्पन्न होते. जर वापरले नाही तर? तेव्हा ऋणात्मक शक्ति उत्पन्न होण्याचे लगेच थांबते. मग दोन-तीन दिवसात तुम्हाला त्याची मिळतील. शौचालय न तोडता ते स्टोअररुम म्हणून वापरता येते. जर घरात-एकच शौचालय असेल तर ते बंद करण्याची किंवा न वापरण्याची गरज नाही. ऋणात्मक शक्ती कमी करण्याचे मार्ग स्वीकारले तर पुढे त्याने पण उत्तम फायदे मिळवता येतील.
तसे पाहिले तर घरामध्ये शौचालय असू नये. कारण शौचालयातून उत्पन्न होणारी ऋणात्मक शक्तीची जाणीव आपल्या पूर्वजांना होती. म्हणूनच आपले पूर्वज नेहमी शौचालय घराच्या बाहेरच बांधायचे. परंतु आपण काय केले आहे? घर बांधताना पाण्याची टाकी आणि शौचालय कुठे असावे या बद्दल डोक्याला शीण देतो. एक शौचालय घरात असले तरी त्याने समाधान न मानता शयनगृहातून लांब जायला त्रास होतो म्हणून शौचालयाला शयनगृह सामवले गेले. तेवढेच नव्हे तर त्याला एक नवे नाव देऊन तशा शयनगृहाला मास्टर बेडरुम असे संबोधू लागलो. एवढ्यावरच न थांबता घरात दोन-तीन मास्टर बेडरुम असण्यावरुन संपत्तीचे मोजमाप करु लागलो. आपल्याला एक गोष्ट माहित असू द्या. मास्टर बेडरुम ही साध्या शयनगृहापेक्षा वाईट व कमी दर्जाची असते. का म्हणून आपण विचाराल? शयनगृह ही घरातील एक अत्युत्तम जागा आहे. कारण आपण तेथे सहा ते आठ तास विश्रांती घेतो. शौचालय शयनगृहात असल्यामुळे दिवसात तीन-चार वेळा वापरणे साहजिक आहे.
जेव्हा आपण शौचालयाच्या दरवाजा उघडाल तेव्हा तेथे तयार झालेली ऋणात्मक शक्ति शयनगृहात पसरते. रात्री विश्रांती घेताना आपण ती ऋणात्मक शक्ति घेतो. त्यामुळे आपल्या आरोग्यात बिघाड होऊ शकतो . आपल्या पूर्वजांना साठ ते ऐंशी वर्षी देखील मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार माहीत नव्हते. आज आपल्याला विसाव्या वर्षीच चहात साखर नको म्हणायची वेळ आली आहे. आपले पूर्वज किती सुखासमाधाने जगले. पण आज आपण सदैव तणावाखाली वावरत असतो. आपण आपल्या पूर्वजांपेक्षा शहाणे आहोत असे समजून त्यांनी रुढ केलेली पद्धत सोडून आमच्याच मार्गाने चालणे हेच आजच्या अनारोग्याचे मुख्य कारण आहे. हे सर्वकालीन सत्य आहे.