हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे.याचे उत्तर देण्याआधी माझा एक प्रश्न आहे…देव कुठे आहे?
हा एक मुख्य विषय असल्याने प्रत्येक जण त्यासाठी ईशान्य दिशाच निवडताना दिसतात. इथे एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष असू द्या. एक वेळ ईशान्य दिशा घराच्या समोरच्या भागात असून तेथे बोरवेल् काढली तर खूपच उत्तम. त्यावेळेपासून त्या घरात पैश्या-अडक्याच्या बाबतीत भरभराट होईल. घराच्या आजूबाजूला आली तरी चालेल, त्याने काही त्रास होणार नाही. परंतु ईशान्य दिशा घराच्या मागच्या बाजूला आली म्हणून तेथे बोरवेल काढली तर मात्र त्यावेळेपासून घरात पैश्या-अडक्या बद्दल अडचणी उद्भवतील. एवढेच नव्हे तर प्रत्येक गोष्टीत तोटा होऊ शकेल .
हे मी सांगतोय म्हणून त्यावर विश्वास ठेऊ नका. तुमच्या मित्र परिवारात किंवा नातेवाइर्कांपैकी कोणाकडे ईशान्य दिशा घराच्या मागच्या बाजूला आली असून तेथे बोरवेल काढली असेल तर त्यांच्या कडून तुम्हाला स्पष्ट चित्र मिळू शकेल. त्या बोरवेलचा वापर त्यांनी ज्या दिवसापासून चाळू केला त्या दिवसा पासुन त्यांना पैशाची अडचण चालू झाली असणार. आजची प्रचलित वास्तुशास्त्राची पुस्तके वाचून घरच्या मागच्या भागात ईशान्य दिशा आली असेल तर तेथे बोरवेल काढून पैशाच्या अडचणींना तोंड देण्याआधी चौकशी करणे चांगले. या बाबतीत एक उदाहरण द्यायचे झाले तर पूर्वीच्या काळी राजे-महाराजे राजवाडा बांधल्यावर राजवाड्याच्या समोरच्या भागातच पाण्याचे कारंजे, बोरवेल बांधत असत त्यामुळे त्यांच्या घरच्यांना उत्तम फळ मिळत असे.
याच संदर्भात मी आणखीन एक उदाहरण देऊ ईच्छीतो. हावेलीमधील एकाच्या घरासमोर वायव्य दिशा येत असून तेथे बोरवेल काढली तर त्यांना चार इंच भरपूर पाणी मिळू लागले. नंतर काही दिवसांनी एका वास्तुशास्त्र तज्ञांचा सल्ला ऐकून ईशान्य दिशेलाच बोरवेल असायला हवी म्हणून ईशान्य दिशेला बोरवेल काढू लागले. वायव्य दिशेला असलेल्या बोरवेलवर दगड ठेऊन ती बंद केली. नंतरच्या काळात झाले काय? ईशान्य दिशेला कितीही खोल खणले तरी पाणी मिळाले नाही. आता ते लोक टँकरमधून पाणी भरून वापरतात. कोणताही सल्ला घेतल्यावर तो किती वैज्ञानिक आहे, प्रॅक्टिकल आहे याचा विचार करुन मगच त्याप्रमाणे वागा हेच, या उदाहरणाने मी निदर्शनाला आणून देतोय. नाहीतर वरच्या उदाहरणातील लोकांसारखे त्रास भोगावे लागतील.