अनेक वास्तुतज्ञांनी लिहिलेल्या वास्तुशास्त्राच्या पुस्तकांमध्ये देवळाच्या सावली घरावर पडू नये असे लिहिलेले असते व ते सल्लाही तसाच देतात. देवळाची सावली घरावर पडू नये याचा खरा अर्थ काय? साधारणपणे देवळाच्या उंची तीस फूट असते. त्याची सावली म्हणजे तीस फूट सोडून घर बांधले तर दुष्परिणाम होणार नाहीत. तीस फुटाच्या आत असेल तर वाईट परिणाम होवू शकतील.
आजच्या सर्व वास्तुशास्त्राच्या पुस्तकांमध्ये अशा घरांमध्ये राहू नये; जे अशा घरात राहातील ते मृत्युला सामोरे जातील. म्हणून अशा घरात कोणीही राहू नये असे लिहिलेले असते. अशी पुस्तके लिहिणार्या वास्तुशास्त्र पंडितांना मी एक प्रश्न विचारतो.
आपण लाखो रुपये खर्च करुन घर बांधतो. नंतर त्या घरासमोर कोणीतरी देऊळ बांधले. आपण लिहिल्याप्रमाणे त्या घरात राहणे योग्य नाही म्हणून ते घर विकायला काढले तर त्याला बिलकुल चांगली किंमत मिळणार नाही. कारण असे घर विकत घेऊन त्यात राहिलात तर तुमचे वाटोळे होईल असे आपण पुस्तकात लिहून ठेवलयं ना? एखाद्याने कर्ज काढून घर बांधले असेल तर त्यांने काय करावे? आपल्या सांगण्याप्रमाणे घर सोडून द्यावे का? कृपया काहीही लिहून लोकांना घाबरवून टाकण्यापेक्षा त्यामागचे वैज्ञानिक कारण समजून घेणे चांगले.
आमच्या सरळवास्तुप्रमाणेही देवळासमोर घर नसावे. त्याने त्या घरात राहाणार्यांना त्रास होतो. परंतु आपण लिहिल्याप्रमाणे मृत्यू ओढवत नाही. देवळासमोर घर का असू नये याचे वैज्ञानिक कारण लोकांसमोर मांडतो. मी पहिल्या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे देवळात मन:शांती मिळते. देवळातील देव आपल्याला मन:शांती देत नाहीत. मग तेथे मन:शांती मिळायचे कारण काय? तेथे असलेल्या नळातील पाणी व घंटानाद ऋणात्मक शक्तिला बाहेर पाठवतो. धनात्मक शक्ति वाढवणारी फुले, आरती, मंगलारती, धूप, दीप यांनीच मन:शांती व समाधान मिळते . घंटानादाने बाहेर ढकलली गेलेली ऋणात्मक शक्ति कुठे जाणार? ज्यांचे घर जवळ आहे त्या घरात ऋणात्मक शक्ति घुसते. ज्यांच्या घरात ती ऋणात्मक शक्ति प्रवेश करते ते घर अशांत होते. रोग आजारांचे स्थान बनते. त्या घरी जे लोक राहातात त्यांना सुखात जगणे अशक्य होते. हेच खरेखुरे वैज्ञानिक कारण आहे. यालाही उपाय आहेत. सरळवास्तुतील सरळ उपायांनी ऋणात्मक शक्ति परत पाठवण्याच्या पद्धतीमुळे त्याच घरात सुख व समाधानाने जगणे शक्य आहे.
अशाच प्रकारे मस्जिद किंवा दरगहच्या समोर घर असेल तर त्या घरात मानसिक त्रास, इतर कुरबुरी कटकटी आणि नातेसंबंधामध्ये दुरावा येतो. अशावेळी ते घर न बदलता सरळ वास्तुतील सुलभ उपाय-योजनांनी बदल घडवून आणता येतात.