कितीतरी ठिकाणी व्याख्यानाच्या कार्यक्रमात श्रोते, त्यात विशेषत: स्त्रिया, बर्याच वेळा आमच्या वास्तुचा परिणाम आमच्या शरीरावर होतो का असा प्रश्न विचारतात. या प्रश्नाला वास्तुचा व शरीराचा संबंध आहे हेच माझे खात्रीशीर उत्तर आहे. न जाणता आपण झोपण्याची दिशा व पलंग ठेवण्याची पद्धत बरोबर नसेल तर त्याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो. ते कसे हे खालच्या चित्रावरुन समजावून सांगतो.
चित्र १
चित्र १ लक्षपूर्वक पाहिले तर पलंग दोन्ही बाजूच्या भिंतीला चिकटलेला दिसेल. अशा प्रकारे असलेल्या पलंगावार स्त्रिया झोपल्या तर त्यांनी कितीही उपवास, मिताहार (डायटिंग) वगैरे केले तरी त्या जाड होतात. हे काय आश्चर्य आहे असे तुम्हाला वाटेल. मी आधी सांगितल्याप्रमाणे घरात शक्तिचा (एनर्जीचा) संचार असतो. घरात पलंग दोन्ही बाजूच्या भिंतीला लागला असेल तर शक्तिचा संचार मुक्तपणे होत नाही. त्यामुळे झोपलेल्या स्त्रीला पूर्ण शक्ति न मिळता त्या जाड होत जातात.
चित्र २
आता चित्र २ पाहा. अशा प्रकारे सामान्यत: प्रत्येक वसतिगृहांमध्ये पलंग ठेवतात. अशा प्रकारे पलंग ठेवणे वैज्ञानिकपणे योग्य आहे. कारण येथे शक्ति कोणत्याही अडथळ्याखेरीज मुक्तपणे फिरत असते. झोपणारी व्यक्ति ती शक्ति सुलभपणे घेत असल्याने जाड होत नाही आणि त्याची प्रकृती आरोग्यपूर्ण राहते.