सर्वसाधारणपणे सर्वजण लग्नासाठी मुलगी दाखवताना मुलीला उत्तर व पूर्व दिशेला तोंड करुन बसण्याची प्रथा पाळतात. अनेक वास्तुशास्त्राच्या पुस्तकांमध्ये या बद्दल लिहिलेले आहे. पण मी आधी सांगितल्याप्रमाणे एकवेळ त्या तरुणीला उत्तर व पूर्व दिशा वाईट दिशापैकी असेल तर लग्न लांबत जाऊन आई-वडील चिंताक्रांत होतील. याच्या जोडीला जर घरात नातेसंबंधाच्या स्थानाचा त्रास असेल तर लग्नकार्यात त्रास होणे साहजिक आहे. सरलवास्तूच्या उपाय योजनांनी समस्या सोडवता येईल, इथे संकेश्वरजवळ राहणार्या एका गौडांच्या घराचे उदाहरण देत आहे. या गौडांनी आपल्या घरात सरळ वास्तुचा उपयोग करुन घेण्यासाठी संस्थेतील तज्ञांना घरी बोलावले होते. तज्ञांनी त्या घराची पाहणी केल्यावर नातेसंबंधाच्या बाबतील त्रास असलेला त्यांच्या लक्षात आला. त्याचप्रमाणे त्या तरुणीची जन्म तारीख पाहिल्यावर तिला पूर्व व उत्तर या दोन्ही दिशा वाईट दिशांमध्ये होत्या. संस्थेच्या तज्ञांनी त्या तरुणीची झोपण्याची खोली पाहून तेथेही काही सल्ला दिले. पुढच्या काळात मुलगा बघायला आल्यावर त्या तरुणीची तोंड पश्चिमकडे करुन बसवायचे सुचवले. तेव्हा गौडांनी विचारले, हे काय सर, उत्तरेकडे तोंड करुन बसवण्याची प्रथा सोडून पश्चिमेकडे तोंड करायला सुचवता? हे कसे काय जमणार?
आमच्या संस्थेच्या तज्ञांनी तुमच्या मुलीचे लग्न व्हायला हवे असेल तर आम्ही सांगतो तसेच करावे लागेल असे ठणकावले. तज्ञांचे इतके स्पष्ट बोलणे ऐक-ल्यावर वधुपित्यानी नंतर आलेल्या दोन-तीन स्थळांना मुलीचे तोंड पश्चिमेकडे करुन मुलगी दाखवली. तिसर्या प्रयत्नाला यश आले. मुलीचे लग्न ठरुन लग्नही झाले. आमच्या संस्थेला पाठवलेल्या लग्नाच्या आमंत्रणाबरोबर गौडांनी आम्ही आपले सदैव कृतज्ञ आहोत असे लिहिले होते. ती तरुणी आता आपल्या पती बरोबर अमेरिकेत राहत आहे.
असले कितीतरी प्रसंग मी तुम्हाला सांगू शकेन. हजारो तरुणींचे अश्रू सरळ वास्तुतर्फे पुसले आहेत. ही संतृप्ती व समाधान माझ्या वाट्याला आले आहे. त्या भगिनींचे आशीर्वाद हे मला व माझ्या संस्थेतील वास्तुतज्ञांना, कितीही पैसे दिले तरी न मिळणारी अमुल्य ठेव आहे ही माझी पक्की समजूत आहे.