
घरातून अनावश्यक साहित्य काढणे अत्यंत गरजेचे आहे.
उदाहरणार्थ – जुने वृत्तपत्रे, मासिके, तुटलेली घडय़ाळे, अनावश्यक कागदपत्रे, मोकळे खोके किंवा पेन आदी.
अनावश्यक वस्तू नकारात्मक ऊर्जा आणत असतात. वापरात नसलेल्या गोष्टी काढून टाका आणि जागा मोकळी करा. त्यामुळे घरात मुलांना आनंदाने खेळण्यासाठी व इतर साहित्य ठेवण्यासाठी अधिक जागा असेल.

शूभ दिशेनुसार झोपणे हे निद्राविकाराने त्रस्त असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी फायदेशीर आहे.
हे सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यास आणि नकारात्मकता नाकारण्यास मदत करते.
तुम्ही शांत व आरामदायी झोपेचा अनुभव घेऊ शकता. आमचे वास्तु सल्लागार तुमच्या शूभ दिशांबद्दल तुम्हाला कळवतील.
सूर्य हा महत्वाचा वास्तु घटक आहे व इमारतीच्या रचनेत त्याचा विचार केला जातो.
वास्तु शास्त्र हे इमारतींच्या रचनेत सुर्य प्रकाशातील बदलत्या तीव्रतेचा प्रत्येक जागेनिहाय, सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत आणि प्रत्येक ऋतूनुसार अभ्यास करते.
घरात सर्वत्र सकारात्मक उर्जा वाढविण्यासाठी सूर्य किरणे अत्यंत महत्वाचे आहेत. हे माहित आहे कि, सूर्याची किरणे घरातून नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी उपयुक्त आहेत.

शयनकक्ष एक अशी जागा आहे जेथे आपण विश्रांती घेतो आणि आपला तणाव दूर करतो. वास्तु नुसार, शयनकक्षात कोठेही उघडा केलेला आरसा असू नये मुख्यत: बेडच्या समोर तो असू नये.
तसेच आरसा हा बेडला समांतर नसावा कारण ते मोठय़ाप्रमाणावर आरोग्याच्या समस्यांशी संबंधित आहे.
ते कुटुंबात वाद-विवाद निर्माण करते. वास्तु तज्ञांचा सल्ला हाच वाढत्या समस्यांना आळा घालण्याचा मार्ग आहे.

सकारात्मकता, हे जंगलाच्या आगीप्रमाणे नाही तर त्यापेक्षाही वेगाने पसरते.
सकारात्मकता तुमच्या सभोवताली शांततापूर्ण वातावरण निर्माण करेल. चला तर मग सकारात्मक ऊर्जेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी आपल्या मनाला प्रशिक्षीत करुया.
समस्या ही कितीही मोठी असली तरी, त्यावर नेहमीच सकारात्मकतेमुळे एक चांगला उपाय मिळतो.