या पुस्तकाच्या माध्यमातून आधीपासूनच दुःखीकष्टी असलेल्या एकत्रित सामान्य जनतेला थोडासा दिलासा मिळेल कारण स्वयंघोषित विद्वानांमुळे, दुर्देवाने कधीही न मिळालेली अशी अती प्रलंबित व अपेक्षित अशी समृध्दी आणि जीवनात अधिक धन मिळण्याच्या मोहाने वास्तुमध्ये सुधारणा व पुर्ननिर्माण करण्याच्या नावावर दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीमुळे वाजवीपेक्षा जास्त खर्च केल्या कारणाने सामान्य जनता जास्त दुःखी होते.
गुरूजींचे ध्येय हे आहे की ` पीडित किंवा त्रासलेल्या लोकांपर्यंत ‘ पोहोचून त्यांना सरळ वास्तुच्या निकषांकडे वळविता येईल. ` कोणत्याही प्रकारची संरचनात्मक मोडतोड नाही, ना ही कोणते प्रमुख मोठे बदल आणि ना ही कोणते पुर्ननिमाण ‘ हा आमचा विक्रीसाठीचा आगळावेगळा मुद्दा ( U.S.P. ) आहे. मी माझ्या प्रयत्नांना तेव्हाच फलदायी समजेन जेव्हा मी लोकांच्या उदास व खिन्न अशा जीवनात थोडेसे परिवर्तन करण्यास पात्र होईन.