या विषयाबद्दल प्रत्येक प्रचलित वास्तुशास्त्रच्या पुस्तकात ईशान्य दिशेला भार असेल तर कुटुंबात खूप त्रास होतो असे लिहिलेले असते. भार का असू नये असे विचारले तर ते एवढेच सांगतात, वास्तुपुरुषाचे डोके ईशान्य भागात असते, तेथे भार असला तर तो वास्तुपुरुषाच्या डोक्यावर पडतो. डोक्यावर भार पडला की वास्तुपुरुषाच्या रागाला आपण बळी पडतो, मग तो आपल्याला त्रास देतो असा त्यांचा समज आहे. आपण सुशिक्षित असून असल्या गोष्टींवर विµवास ठेवतो म्हणजे आपल्या इतके मूर्ख दुसरे कोणीही नसेल. मी तुम्हाला इथे एक उदाहरण देऊ शकतो.
हुबळीत एका चित्रपटगृहाचे मालक, एक श्रीमंत व प्रतिष्ठित व्यक्ति राहातात. त्यांनी सहा वर्षापूर्वी सरळ वास्तु या संस्थेकडून सेवा करुन घेण्यासाठी आम्हाला त्यांच्या घरी बोलवले. आम्ही त्या घरात छोटे छोटे बदल करायला सुचवले. तेव्हा त्यांनी ईशान्य भागात असलेल्या पायर्यांबद्दल विचारले. मी त्या पायर्यांचा काही त्रास नाही असे सांगितले. त्यांनी या पूर्वी दहा बारा वास्तुशास्त्र पंडितांना विचारले तेव्हा प्रत्येकांने ईशान्य भागात असलेल्या पायर्या तोडून टाकल्यावरच तुम्हाला तुमच्या घरात