अनाहत चक्र ( याचा अर्थ अपराजित किंवा सुटा झालेला ) अथवा हृदय चक्र हे मानवी शरीरातील 4 थे चक्र आहे. इतरांसोबत सामायिक दृढ झालेले नाते संबंधांना हे चक्र नियंत्रित करते तसेच बिनशर्त प्रेमाकरिता आसन आहे. प्रेम ही एक घाव भरून येण्याची नैसर्गिक शक्ती आहे त्यामुळे ह्या चक्राला उपचाराचे केंद्र मानले जाते. निःस्वार्थीपणा, स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी प्रेम, क्षमा, अनुकंपा तसेच आनंद हे संतुलित तसेच उघडलेल्या अनाहत चक्राचे भिनलेले वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहेत. यामध्ये इच्छा पूर्ण होण्याची शक्ती आहे आणि जर चक्र उत्तम प्रकारे संतुलित आणि शुध्द असेल तर इच्छा लगेचच पूर्ण होतात.

हे चक्र कमळाच्या फुलाबरोबर 12 पाकळ्यांसमवेत ( हृदय बारा दिव्य गुणांना सूचित करतात. ) प्रतिकात्मक रित्या दर्शविले जाते. याचा मंत्र ` यम ‘ आहे आणि रंग हिरवा आहे.

अनाहत चक्राचे स्थान –

हे चक्र छातीच्या मध्यभागी ( दोन स्तनांच्या दरम्यान ) स्थित असते.

अनाहत चक्राशी संबंधित अवयव आणि आजार –

हे चक्र मुख्यतः हृदय आणि फुफ्फुसांचे कार्य नियंत्रित करते. ह्यामुळे त्वचा, हात, रक्ताभिसरण संस्था, रोगप्रतिकार प्रणाली आणि उरोधिष्ठ ग्रंथी ( थायमस ग्लॅण्ड ) नियंत्रित केल्या जातात.

हृदयाचे विकार व हृदयाचे जोरात धडकणे, हृदयगती थांबणे, उच्च / निम्न रक्तदाब आणि फुफ्फुसाचा व स्तनांचा कर्करोग, अॅलर्जी, ताप, अस्थमा, क्षयरोग आणि छातीत रक्तसंचय हे सुध्दा काही आजार आहेत ते हृदय चक्राच्या काम न करण्यामुळे होतात.

अनाहत चक्र बंद होण्यामुळे अथवा असंतुलनामुळे होणाऱ्या समस्या –
  • अति सक्रिय अनाहत चक्र –
    जेव्हा अनाहत चक्र अति सक्रिय होते तेव्हा व्यक्ती भावनांनी भारावलेला ( जसे की राग येणे, उदास होणे, ईर्ष्या करणे, आनंदी होणे इत्यादी सहित ) असल्याचे अनुभव करतो. प्रेम अटींवर केले जाते आणि परिणामस्वरूप त्यावर मालकी हक्क असल्याची जाणीव होते. नातेसंबंध केव्हा संपले व विश्वासार्ह राहिले नाहीत हे समजणे अशक्य होते किंवा तसेच अपमानजनक व द्वेषपूर्ण नातेसंबंधांबरोबर जगावे लागते.
  • निम्न सक्रिय अनाहत चक्र –
    जेव्हा हे चक्र निम्न सक्रिय असते किंवा पूर्ण निष्क्रिय होते तेव्हा व्यक्ती प्रेमास विरोध करतो परिणामस्वरूप त्याला स्वतःचा तीव्र तिटकारा येतो आणि दया तसेच निरूपयोगी असल्याची भावना निर्माण होते. निम्न सक्रिय असलेल्या चक्राचे लोक इतरांविषयी अनुमान बनवितात आणि स्वतःच्या अपयशासाठी दुसऱ्यांना दोष देतात.
संतुलित अनाहत चक्राचे फायदे –

ज्या लोकांचे अनाहत चक्र संतुलित असते त्या व्यक्ती निरपेक्ष प्रेम करण्यास सक्षम असतात तसेच इतरांबद्दल खरी अनुकंपा व आत्म स्वीकृती दाखवितात आणि त्यामुळेच ते इतरांवर निरपेक्ष प्रेम करण्यास व लोकांना स्वीकारण्यास अनुमती देतात. असे लोक स्वभावाने निःस्वार्थी असतात. ज्या लोकांचे अनाहत चक्र संपूर्णपणे उघडलेले व शुध्द असते ते लैंगिक प्रेमाद्वारे आध्यात्माचा देखील अनुभव घेतात.

अनाहत चक्राला उघडणे –
  • सगळ्यांवर निरपेक्ष प्रेम करणे ही हृदय चक्र उघडण्याची प्राथमिक पध्दत आहे. स्वतःवर प्रेम करून आणि स्वतः बद्दल कृतज्ञ असल्यावरच व्यक्ती दुसऱ्यांवर प्रेम करू शकतो.
  • कोणत्याही एखाद्या विशिष्ट चक्राची ध्यान धारणा करणे हा चक्र उघडण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. योगासनांमध्ये गरूडासन ( अथवा गरूडाची मुद्रा ) तसेच गोमुखासन ( अथवा गायीची मुद्रा ) या स्थितीत बसल्याने अनाहत चक्र उघडले जाते.
  • ध्यान धारणा करताना हृदयाजवळ हिरव्या रंगाची कल्पना करावी. हिरव्या रंगाचे कपडे घालावे किंवा हिरवा रंग लावलेल्या खोलीत बसून ध्यान केले जाऊ शकते. हिरव्या वनस्पती व झाडांच्या शेजारी बसून मनन करणे हा एक पर्याय आहे.
  • चौथ्या चक्रासाठी पायात काहीही न घालता चालणे किंवा हिरव्या गवतावर पडून राहणे चांगले असते.
  • खडे आणि रत्नांना परिधान करणे अथवा हिरव्या रंगाचे क्रिस्टल्स ठेवल्याने चक्राचे संतुलन होते. जेड ( हिरव्या रंगाचा मौल्यवान खडा ), पेरिडॉट, पाचू, ग्रीन जेस्पर ( सूर्यकांत मणी ), रोझ क्वार्ट्ज इत्यादी मणी व रत्न यांचा समावेश आहे.
  • घराच्या वास्तु अनुरूप खोलीमध्ये व्यक्तीच्या अनुकूल दिशेस झोपल्याने अनाहत चक्र जागृत होते.
  • सुगंध चिकित्सेमध्ये निलगिरी, देवदारचे लाकूड, पचौली इत्यादी प्रकारच्या आवश्यक तेलांना लावणे ( ध्यान व मनन करताना लावणे चांगले असते ) यांचा यात समावेश असतो.
  • हृदय चक्रासाठी हिरवे सफरचंद, हिरव्या पालेभाज्या, लिंबू, काकडी इत्यादी खाद्य पदार्थांचा समावेश असतो.