सेवा निवृत्ती म्हणजे काय ? तुम्ही सरकारी नोकरीत किंवा खाजगी कंपनीत अथवा तुमच्या स्वतःच्या व्यवसायात कार्यरत असले तरी सेवानिवृत्ती हे एक वास्तव आहे. हे एक सत्य आहे. लोक यास कशा प्रकारे हाताळतात यात विभिन्नता आहे.
नियोजन न केलेल्या सेवानिवृत्तीमध्ये लोकांना तणाव असतो. उलटपक्षी जे लोक आधीच सेवानिवृत्तीचे नियोजन करतात व त्याची ते खूप आतुरतेने वाट पाहात असतात. ज्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या योजना आधीच अनेक वर्षांपूर्वी आखलेल्या असतात त्यात खर्चिक यात्रा, क्लबमध्ये दाखल होणे, आपल्याला आवडेल त्या गोष्टींकडे आस्थापूर्वक लक्ष देणे (passion) ज्या गोष्टी त्यांनी नोकरी करणे किंवा त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दुर्लक्ष केले होते यासारख्या गोष्टी भविष्यात करण्याची वाट पाहात असतात.
तथापि सगळ्यात मोठा प्रश्न सेवानिवृत्तीच्या आधी प्रत्येक जण विचारतो की निवृत्त होणारी व्यक्ती आर्थिक व भावनिक रित्या जीवनात नव्याने येणार््या पुढील सेवानिवृत्तीच्या टप्प्यासाठी तयार आहे का ?