चित्र-१
या चित्रात दाखल्याप्रमाणे सरळ वास्तु अनुसार
दिवाळी सण असा साजरा करतात
आपल्या संस्कृतीचे जतन करणे हे सर्व सण-वार साजरे करण्यामागचे मूलभूत कारण आहे. या विविध सणावारांमुळेच आपली संस्कृती जिवंत ठेवणे साध्य झाले आहे. प्रत्येक सणाचे एक वैशिष्टय जसे असते तसेच त्यामागचा विचारही वेगळा असतो. दिवाळी हा भारतीय संस्कृतीत सर्वात मोठा सण समजला जातो. म्हणूनच स्वाभाविकपणे भारतातील सर्व प्रांतात हा सण साजरा करण्याची परंपरा आहे.
आमच्या सरळवास्तुतही आम्ही या सणाला विशेष महत्त्व देतो. या सणातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील नको असलेल्या वास्तु घरातून काढून टाकणे. घराची रंगरंगोटी करुन कुटुंबातील सर्वांनी नवे कपडे घालून उत्साहाने सण साजरा करणे, जुन्या वस्तू, नको असलेल्या गोष्टी, रद्दी पेपर अशा गोष्टी घरात ठेवल्याने घरातील ऋणात्मक शक्ति वाढते आणि त्यामुळे घरातील मन:शांती, समाधान, प्रगतीला मारक ठरते. या उद्धेशानेच घरातील जुन्या वस्तू बाहेर टाकल्याने ऋणात्मक शक्ति कमी करुन जीवन प्रगतीपथावर नेण्याला मदत होते. घर स्वच्छ करण्याने व रंगरंगोटी करण्याने घरातील ऋणात्मक शक्ति नाही होते, व झाल्याने धनात्मक शक्तिच्या येण्याला अनुकूल वातावरण निर्मिती होते. दिवाळी सणामध्ये मोठ्या प्रमाणात धनात्मक शक्तिच्या आगमनाची तयारी होते.
आपले पूर्वज वडीलधारी मंडळी जे सांगत होते ते आठवून पाहा ‘घरासमोर रांगोळी घाला … दिवा लावून ठेवा … लक्ष्मी येईल.“ थोडा जरी विचार केला तर हे वाक्य किती अर्थपूर्ण आहे हे तुमच्या लक्षात येईल. येथे लक्ष्मी येते म्हणजे त्याचा अर्थ काय? लक्ष्मी म्हणजे पैसा नव्हे. आपले पूर्वज धनात्मक शक्तिला लक्ष्मी आणि ऋणात्मक शक्तिला दृष्टी असे संबोधत होते. रांगोळी घालून दिवा लावून ठेवल्यावर लक्ष्मी येईल म्हणजे धनात्मक शक्तितुमच्या घरी प्रवेश करुन घरात सुख-शांतीसमाधान नांदल्यामुमुळे घर हे मन:शांतीचे मंदीर होईल. खरोखर हाच दिवाळी सणाचा सांकेतिक अर्थ आहे.
आपले पूर्वज सांगत असलेली आणखी एक गोष्ट म्हणजे तिन्हीसांजा झाल्यावर घरात देवासमोर दिवा लावा… हे सांगण्या मागचे महत्त्वाचे कारण म्हणजे अंधार पडल्यावर घरात ऋणात्मक शक्ति वाढते. दिवा लावण्याने धनात्मक शक्तिला आत घेऊन ऋणात्मक शक्ति घराबाहेर टाकते.
अंध:कारला पिटाळून लावून प्रकाशाचा विजय साजरा करणार्या या सणाप्रमाणेच सरळ वास्तुशास्त्र हे प्रचलित वास्तुशास्त्र असून विषयात असणारे अज्ञान व अंधकार काढून टाकून वैज्ञानिकतेच्या आधाराच्या प्रकाशद्वारे लोकांचे जनजीवन प्रक्रशमय करेल यात तिळमात्र ही शंका नाहा.