वास्तु किंवा वास्तुशास्त्र म्हणजे काय हे माहित आहे. परंतू सरळ वास्तु म्हणजे काय असा विचार मनात येईल. सरळ हा एक संस्कृत शब्द आहे. बर्याच भाषांमध्ये हा शब्द सरळ असाच वापरतात. सरळ म्हणजे सुलभ, सोपे असा अर्थ आहे. काहीही त्रास न होता अंमलात आणू शकणारी एक वास्तुकला. म्हणूनच आम्ही याला सरळ वास्तु असे नाव दिले आहे. ही सरळ वास्तु प्राचीन भारतीय संस्कृतीवर आधारलेली आहे. आपले पूर्वज हजारो वर्षापासून जे पाळत आले आहेत त्याच गोष्टी यात संकलित केल्या आहेत. थोडक्यात सांगायचे तर आपल्या पूर्वजांनी पाळलेल्या पद्धतींना विसरुन, अलिकडच्या काळात डोक्याला त्रास करुन घेऊन लाखो रुपये गमावून इमारतीची तोड-फोड करणार्या पद्धतीला आमची ही “सरळ वास्तु” आव्हानात्मक उभी आहे.