८. मुख्य दाराच्या दिशेचे महत्व

हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. याचे उत्तर देण्याआधी माझा एक प्रश्न आहे… देव कुठे आहे?

प्रचलित वास्तुच्या पुस्तकांनी प्रत्येकाच्या मनात उत्तर किंवा पूर्व भागात असलेले घर, उत्तर किंवा पूर्व दिशेला घराचा मुख्य दरवाजा असेल तरच चांगले हा विचार ठसवला आहे. हे खरोखरच कितपत योग्य आहे याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा…त्याचप्रमाणे दक्षिण किंवा पश्चिमेला दरवाजा असणार्या घरातील लोकांची भरभराट झाली नाही का? त्यांची उन्नती झाल्याची आमच्याजवळ शेकडो उदाहरणे आहेत. मी एक प्रश्न लोकांपुढे ठेऊ इच्छितो, काही घरात वडिलांनी नावलौकिक कमावून पैसा मिळवलेला असतो, त्या जागेवर मुलगा आल्यावर सर्व पैसा जाऊन पतही नाहीशी होते अशी कितीतरी उदाहरणे प्रत्येक गावात सापडतात. वडिलांना मानवलेले ते घर मुलाच्या कारकिर्दीला असे होण्याचे कारण काय? या प्रश्नाला कोणत्याही वास्तुतज्ञांकडे उत्तर आहे का?

मी एकदा हुबळीच्या चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेत व्याख्यान देत असताना मान्यवर श्री. मदन देसाई हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी सर्व सभासदांसमोर मला एक प्रश्न उपस्थित केला. मुंबईत एक २९ मजल्यांची इमारत आहे. त्या इमारतीच्या १३ व्या व १४ व्या मजल्यावरच्या दोन्ही घरांचा सर्व प्रकारे प्रचलित वास्तुशाश्त्राप्रमाणे उत्तर दिशेला घराचा मुख्य दरवाजा आहे, आग्नेय दिशेला स्वयंपाकघर, ईशान्य दिशेला देवघर, नैऋत्य दिशेला घराच्या मालकाचे शयनगृह या प्रकारे आहे. १३व्या मजल्यावर राहाणार्याला पैसा ठेवायला जागा पुरत नाही, म्हणजेच तो बर्यापैकी श्रीमंत आहे. परंतु त्याच इमारतीतील १४व्या मजल्यावर राहाण्याचे घरही त्याच पध्दतीचे असले तरी तो खूप कर्जबाजारी झाला आहे आणि सर्व प्रकारच्या त्रासाने पीडित आहे. असे का हे सांगाल का असे मला विचारले.

मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सर्वप्रथम उत्तर व पूर्व दिशा सर्वांना उत्तम आहेत असे समजू नका असे सांगितले. जन्मतारखेप्रमाणे प्रत्येकाला लाभदायक दिशा आणि वाईट दिशा असतात. त्यांना पूर्व व उत्तर दिशा लाभदायक असेल तर त्यांच्या त्या घरात भरभराट होते. परंतू त्याच उत्तर व पूर्व दिशा त्यांना वाईट असल्या तर त्या घरात सर्व गमावणे शक्य आहे असे सांगून त्यांना एकाच घरातील वडील आणि मुलाचे उदाहरण दिले. तेव्हा त्यांना माझे उत्तर पटले. या पुढे तरी सर्वांनाच पूर्व व उत्तर दिशा श्रेष्ठ आहेत, दक्षिण व पश्चिम दिशा उत्तम नाहीत असे म्हणू नका. ते ज्याच्या त्याच्या जन्मदिनावर आधारित असते. त्याप्रमाणे ते घरात राहिल्यावर त्यांची भरभराट होईल.

या बाबतील अजून एक उदाहरण द्यायचे झाले तर ते म्हैसूरचे प्रख्यात नट व निर्माते श्री एम्. पी. शंकर यांचे देता येईल. अनेक चित्रपटांमधे काम करुन, अनेक चित्रपटांची निर्मिती करणारे श्री शंकर हे कर्नाटकात सुपरिचित आहेत. णी एकदा म्हेसूरच्या रोटरी क्लबमध्ये व्याख्यान द्यायला गेलो असता माझे स्नेही श्री. कुलकर्णीकडून श्री. एम. पी. शंकर यांचा परिचय झाला. तेथे वास्तुशास्त्रबद्धल बोलणे निघाले. तेव्हा त्यांनी कृपा करुनवास्तुशास्त्रबद्धल माझ्यासमोर काहीही बोलू नका असे निक्षून सांगितले. का असे विचारताच त्यांनी सविस्तरपणे सांगितले. मी कर्नाटकात वास्तुशास्त्रबद्धल अनेक पुस्तके लिहिणार्या एका वास्तुशास्त्रातील पंडिताकडून प्रत्येक सल्ला घेऊन घर बांधले. उत्तर दिशेला घराचा मुख्य दरवाजा, ईशान्य दिशेला देवघर, आग्नेय दिशेला स्वयंपाकघर, नैऋत्य दिशेला घरमालकाचे शयनगृह असे त्यांच्या सांगण्याप्रमाणे घर बांधले. परंतु पुढे झाले काय? त्या घरापासून प्रचंड त्रास भोगून शेवटी ते घर विकून दुसरे घर बांधून राहातोय. विकलेल्या त्या घराबद्दल अजूनही म्हेसूरचे लोक म्हेसूरच्या राजवाड्यानंतर याचेच घर आलिशान होते असे म्हणत असतात. पण तसले घरही मला ठेवता आले नाही. तेव्हापासून मला वास्तुशास्त्र या शब्दाची अँलर्जी आहे. कारण त्याच्यामुळेच मी इतके सुंदर घर गमावले. तेव्हा मी त्यांना आमच्या सरलवस्तूबद्धल सविस्तरपणे सांगितले. शिवाय यात आम्ही काहीही तोडफोड करायला सांगत नाही म्हटल्यावर त्यांनी सरळ वास्तुची अंमलबजावणी करायला मान्य केले. मग आम्ही त्यांना सल्ला दिला. त्यांच्या पहिल्या घरात काय दोष होता हे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक माणसाला चार अनुकूल दिशा व चार प्रतिकूल दिशा असतात व त्याला अनुसरुन आपल्याला विचार करावा लागतो.

सर्वांनाच उत्तर व पूर्व दिशा अनुकूल असतात असे नाही. त्याचप्रमाणे श्री. एम. पी. शंकर यांच्या जन्म दिवसाप्रमाणे पाहिल्यावर उत्तर दिशा ही त्यांच्या चार प्रतिकूल दिशामध्ये अत्यंत वाईट दिशा होती. अत्यंत वाईट दिशेला घराचा मुख्य दरवाजा आल्यावर असे नुकसान होणार यात बिलकुल शंका नाही.

हे उदाहरण आपल्यापुढे सांगायचे कारण श्री. शंकर हे कर्नाटकातील प्रसिद्ध व्यक्ति आहेत. शिवाय वास्तुशास्त्राच्या नावाखाली इमारत फोडून बदल करुन लाखो रुपये घालवणे थांबले पाहिजे हीच आमची इच्छा आहे. नंतर एकदा मी पुन्हा व्याख्यानाला गेलो असता फोनवर शंकर यांची चौकशी केली. तेव्हा त्यांनी खूप बदल झाला आहे आणि मी शांती व समाधानाने जगत आहे, असे सांगून, आग्रहाने घरी बोलवून गोड खायला घातले.

Vastu Solution
Book your Appointment

* We will call you via video for Free Vastu Prediction .

Free Vastu Prediction

It’s a service provided by “Guruji” for the betterment of mankind.

Steps for Free Prediction

  • Select your preferred date and time
  • Our team will call you via Video at your preferred time.
  • We will create & analyse your house plan
  • Based on your house plan, we will tell you the actual cause of your problem for FREE!