भारताचा नकाशा
वर दिसत आहे तो भारताचा नकाशा पहा
मी या विषयाबद्दल काय सांगावे, काय लिहावे असा गोंधळून गेलो आहे. देशभरातील प्रत्येक राज्यातील वास्तुपंडितांनी लिहिलेल्या वास्तुपुस्तकांमध्ये भारत वास्तुशास्त्राप्रमाणे नाही किंवा भारत देशाची वास्तु बरोबर नाही असे ठामपणे लिहिले आहे. हे माझ्या गोंधळाचे खरे कारण आहे. भारतदेशाबद्धल अभिमान बाळगणारा एक नागरीक, एक इंजिनियर आणि सरळ वास्तुतज्ञ या सर्व नात्याने भारतदेश वास्तुशास्त्राप्रमाणे आहे असा मांडणारा मी एकमेव व्यक्ति आहे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
वास्तुशास्त्रावर पुस्तके लिहणार्या पंडीतानी भारत देशाची वास्तु, वास्तु शास्त्रा प्रमाणे नाही, असे लिहीले आहे.
१. कोणत्याही देशाचा ईशान्य भाग उंचावर नसावा. परंतु भारताच्या ईशान्य भागातच हिमालय पर्वत आहे.
२. ईशान्य भाग तुटला गेलेला आहे.
३. दक्षिण भागात पाणी असू नये.
४. दक्षिण भाग विस्तारात कमी होत जाऊ नये.
ही सर्व कारणे देऊन भारत वास्तुशास्त्राप्रमाणे नाही, भारतात सर्वत्र रोगराई पसरलेली आहे, अपघाताचे प्रमाण खूप जास्त आहे, अंत:कलह भरपूर आहेत, त्यामुळे या देशाची भरभराट कधीच होणार नाही असे लिहिले आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याआधी वास्तुशास्त्राची पुस्तके लिहिणार्या पंडितांना, तज्ञांना मी खालील प्रश्न विचारतो.
१. अनादी काळापासून भारतदेश संपत्तीने समृध्द राष्ट्र होते की नाही?
२. आपला देश इतका समृध्द होता की इतर देशांनी अनेक वेळ हल्ले करुन आपली संपत्ती लुटून नेली या बद्दल माहिती नाही का?
३. भारताचे एक राज्य असलेल्या कर्नाटकातील हंपीमध्ये सोने शोराच्या मापाने मोजत होते आणि हिरे-माणके रस्त्यावर विकत होते असे परदेशातील प्रवाशांनी प्रवासवर्णनांमध्ये लिहिलेले वाचले नाही का?
४. ब्रिटिशांनी भारतात येऊन देशाला गुलामगिरीत अडकवून देशाची सर्व संपत्ती लुटली तरी आजमितीला भारत कोणत्या स्थानावर आहे याची कल्पना नाही का?
५. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा शेजारच्या पाकिस्तानही स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला. स्वातंत्र्यानंतरच्या ६३ वर्षात आपण कोणत्या स्थानाला पोहचलो आहोत, शेजारचा देश कोणत्या स्थानावर आहे, हे विस्ताराने सांगण्याची गरज आहे का?
६. पोखरण मध्ये अणुशक्तिचे प्रयोग केले तेव्हा जागतिक वलयातील काही बलिष्ठ देशांनी बंधने घातली. त्यात भारताला काही उणीवा भासल्या का? पुढे काही वर्षाच्या आत सर्व देशांनी बिनशर्त सर्व बंधने मागे घेतली हे आपल्याला माहित नाही का?
७. अणुशक्ति असलेल्या सहा राष्ट्रांपैकी भारत एक आहे हे तुम्हाला माहित आहे का?
८. साठ कोटी रुपयांचे रस्त्याचे काम एकावेळी हाती घेणारे भारत हे एकमेव.
९. मर्सिडिझ् बेंझ, फोर्ड, होंडा या गाड्या पूर्वी भारतात पाहायला मिळत नव्हत्या. आज त्याच गाड्या भारतात तयार होऊन बाहेर देशात विकल्या जातात हे तुम्हाला माहित आहे का?
१०.अलीकडच्या पाहणीप्रमाणे जगातील इंजिनियरिंग, मेडिकल् व एम्. बी. ए. च्या विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थीच जास्त प्रमाणात आहेत व त्यांची गुणवत्ताही लक्षणीय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? वर दिलेल्या उदाहरणांनी भारत देश वास्तुशास्त्राप्रमाणे आहे किंवा नाही याबद्दल आपले उत्तर काय आहे…? आमच्या सरळवास्तुप्रमाणे पाहीले तर भारतदेश वास्तुशास्त्राप्रमाणेच आहे. सरळ वास्तुप्रमाणे कोणतेही घर किंवा व्यवसायाचे ठिकाण, गाव किंवा तालुक्याचे ठिकाण, जिल्हा राज्य, देशाची भरभराट व्हायलाच हवी.
वर दाखवलेला भारताचा नकाशा पाहा. देशाचे मुख्य कामकाज जेथे चालते ते संसदभवन – पार्लमेंट हाउस – हे दिल्लीत आहे. त्याच्या मागच्याच भागात हिमालय पर्वत आहे. आता दक्षिण भागात पाहिले तर तिन्ही बाजू समुद्रांनी व्यापलेल्या आहेत. अशा प्रकारचा भप्रदेश आपल्या देशाला मिळालेले भाग्य आहे असे म्हणता येईल. अलीकडच्या काळात भारत प्रगतीपधावर वाटचाल करत आहे हे तुम्ही जाणतच आहात. पुढे २०२० च्या आत भारत ही सुपर पॉवर होणार यात बीलकुल शंका नाही. विषयाला संपूर्णपणे वास्तुनिष्ठपणे जाणून घेतल्यावरच त्याबद्दल बोलावे किंवा लिहावे एवढीच विनंती मी वास्तुपंडितांना करतो.
आपल्याला जेवढे माहित आहे तेवढेच लिहून लोकांना चुकीच्या मार्गाला नेले तर नंतर लोकच तुम्हाला योग्य ते उत्तर देतील. वास्तुशास्त्रबद्धल तुम्ही लोकांना चुकीच्या मार्गाला नेत असल्यामुळे मी पुस्तकाच्या सुरुवातीच्या पानावर वास्तुपुरुषाचे चित्र काढून त्याच्यावर फुली का मारली आहे हे तुम्हाला समजले असेल.