प्रचलित वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील जिना (स्टेअरकेस) घराच्या मध्यभागी असू नये. त्यातील पायर्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात, ईशान्य दिशेला असू नयेत. शिवाय घराच्या मुख्य दरवाज्यासमोर जिना असू नये, असला तर तो तोडावा, असे प्रचलित वास्तुशास्त्रांच्या पुस्तकांमध्ये लिहिलेले आहे. एवढेच नव्हे तर वास्तुबद्दल सल्ला देणारे बहुतेक लोक असाच सल्ला देतात.
जीन्याशी निगडित असणार्या सर्व समस्यांमध्ये आपल्याला जिना तोडण्याची मुळीच गरज नाही. या समस्यांना न तोडता सरळ वास्तुद्वारे तोडगा सापडू शकतो. प्रचलित वास्तु पंडित घराच्या आवारातील काही झाडे काही विशिष्ट दिशेला घराच्या समोर असल्यास आपल्याला चांगले नाही, ती तोडून टाका असा सल्ला देतात. कृपा करुन असले क्रुर व अमानुष कृत्य करुन पापाचे भागी होऊ नका.
ती झाडे आपल्याला फुलं-फळं, लाकूड देतात. वातावरण शुध्द करतात. शिवाय जास्त पाऊस येण्याला मदत करतात. भूमीची सुंदरता वाढवतात. आपल्याला सावली देऊन घर गार ठेवतात. इतकी उपयुक्त असणारी ही झाडे आपले चांगले मित्र असताना त्यांना कल्पवृक्ष असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
घराच्या मुख्यद्वार समोर मोठे झाड आह
प्रचलित वास्तुशास्त्राप्रमाणे घराच्या मुख्य दरवाज्यासमोर झाड असू नये अशी सर्वांची ठाम समजूत आहे. परंतू ते तोडून टाकणेही मूर्खपणाची पराकाष्ठा होईल. त्याचा दुष्परिणाम काढून टाकायला दुसरे सरळ उपाय आहेत. सरळवास्तुमध्ये झाड न तोडता त्यातून उद्भवणार्या समस्या सोडवण्याची किमया आहे.
घराच्या मुख्यद्वार समोर विजेचा खांब आहे
घरातील हॉल किंवा दिवाणखाना ही महत्त्वाची जागा असून त्याचा घरातील व्यकि्ंतवर परिणाम होतो. या भागात आपण ठेवत असलेला सोफा, खुर्च्या, टिव्ही इत्यादी ही खूप महत्वाचे आहे. काहीवेळा या सजावटीच्या गोष्टी घरात प्रवेश करणार्या शक्तिला अडथळे आणतात. हॉलमध्ये वर उल्लेख केलेल्या सजावटीच्या गोष्टी मांडण्याआधी सरळवास्तु तज्ञांशी संपर्क साधून त्यांचा सल्ला घेतलेला बरा.
घर बांधताना देवाच्या पूजेच्या जागेला वेगळेच महत्त्व आहे. पूजेचे ठिकाण कोणत्या दिशेला असायला हवे या बद्दल आधीच सविस्तरपणे सांगितले आहे. वास्तु पुस्तकामधल्या पंडितांप्रमाणे देवांना ईशान्य दिशेलाच ठेवायला पाहिजे असे नाही. देवाचा देव्हारा जिन्याच्या खाली असू नये व त्याचप्रमाणे शौचालयाच्या भिंतीला लागलेला नसावा. त्याच्यावर किंवा खालीही नसावा. देवाच्या ठिकाणी धनात्मक शक्तीची (एनर्जी) निर्मिती होत असते. शौचालयात ऋणात्मक शक्तीची निर्मिती होत असते. या दोन्ही अगदी जवळ असल्या तर शक्तिच्या विरुध्द स्वभावधर्मामुळे तेथे राहाणार्या लोकांना मन:शांती, समाधान लाभत नाही. म्हणून देवघर बांधताना या सर्व बाबींकडे लक्ष दिले तर अशा प्रकारचा त्रास व कटकट होणार नाही.