मुलाधार चक्र अथवा मूळ चक्र ( रूट चक्र ) हे मानवी शरीरातील प्राथमिक चक्रामधील सर्वप्रथम चक्र आहे. जरी सगळ्या चक्रांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे तरी सुध्दा काही जणांचा विश्वास आहे की, मुलाधार चक्र आरोग्य व सर्व कल्याणासाठी सर्वात महत्त्वपूर्ण आहे. असे मानले जाते की, मागच्या जन्मातील आठवणी तसेच केलेल्या कार्याला या क्षेत्रात संग्रहित केले जाते. हे चक्र मानव आणि प्राण्यांच्या जाणीवांदरम्यान सीमा रेषेचे काम करते. येथे प्रत्येक व्यक्तीच्या भविष्याबदद्ल आणि व्यक्तित्व विकासाचा पाया बनण्यास सुरूवात होते. या चक्रामुळे मानवाला चेतनाशक्ती, जोम आणि संवर्धन ही वैशिष्ट्ये प्राप्त होतात. मात्र हे चक्र जर अयोग्यपणे कार्यरत झाले तर परिणामस्वरूप आळस व स्वकेंद्रित वृत्ती निर्माण होऊ शकते.
प्रतिकात्मक रित्या हे चक्र कमळ व चार पाकळ्या या रूपात दर्शविले जाते ज्यामध्ये चार पाकळ्या या सुप्त मनाच्या चार भावनांना सूचित करतात. या चक्राचा मंत्र आहे ` लाम ‘. मुलाधार चक्र किंवा आपले मूळ हे ` धरा ‘ आहे आणि त्याचा रंग लाल आहे.