Positive energy

सरळ वास्तु शरीरातील नकारात्मक ऊर्जास्रोतांना दूर करून शरीराच्या सकारात्मक ऊर्जा स्रोतामध्ये वाढ करण्यास मदत करते.

आपल्याला माहित आहे की आपल्या आसपास निसर्ग किंवा पर्यावरण भरपूर ऊर्जेने व्यापलेले आहेत. या ऊर्जेला नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा मध्ये वर्गीकृत केले जाते. सरळ वास्तु नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पूर्णपणे कमी करतो किंवा संपूर्णपणे नेस्तनाबूत करतो आणि बदल्यात सगळीकडे सकारात्मक ऊर्जेला खेचून घेतो. सरळ वास्तु घरामध्ये सकारात्मक ऊर्जा चा प्रवाह येण्याच्या उद्देश्याने साधे, स्विकारण्याजोगे, पूर्णपणे उपयुक्त अशा सुधारणा आणि बदल करण्याचा सल्ला देतात. अशा प्रकारचे बदल केलेल्या घरामध्ये घरात राहणाऱ्या व्यक्तिंना चांगले लाभ प्राप्त होतात, त्यामुळे ते चांगले आरोग्य, संपत्ती तसेच शांतीपूर्ण जीवन जगू शकतात. आज आपल्या आसपास असलेल्या नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कमी करण्याच्या सर्व संभवनीय उपायांचा विचार करायचा आहे. कोणत्याही प्रकारचे रचनात्मक बदल न करता आपण फ्लॅट किंवा अपार्टमेंटमध्ये राहतो या जीवनाच्या वस्तुस्थितीला आपण नाकारू शकत नाही. परंतु सरळ वास्तुच्या संकल्पनांचा आणि तत्त्वांचा उपयोग करून आपण घर किंवा कामाच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा ला खेचून आणणे आणि नकारात्मक ऊर्जा स्रोताला कमी करण्यास सक्षम होऊन आपल्याला आणि आपल्या परिवारातील सदस्यांना एक स्वस्थ, शांतीपूर्ण तसेच संतुष्ट जीवन देऊ शकू.

वास्तविकता : सरळ वास्तु साधे, सहज आणि निर्दोष शास्रीय उपाय माणुसकीच्या भल्यासाठी देऊ करतो त्यामुळे निराशेचे कोणतेही कारण राहात नाही. डॉ. श्री. चंद्रशेखर गुरूजींची दृढ संकल्पित इच्छा होती की, कोणताही भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला सरळ वास्तुमुळे त्याच्या/तिच्या जीवनात सुख, समृध्दी, शांती आणि स्थिरचित्ततेचे फळ मिळावे आणि ज्या गोष्टीला मिळविण्याची जगातील सगळ्यांची इच्छा असते व ते साध्य करण्यासाठी तो/ती जीवनभर महत्त्वाकांक्षी असतात.