या विषयाबद्दल आपण थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. पूर्वी आपल्या पूर्वजांनी घरे बांधली तेव्हा त्या सर्वांनी आग्नेय दिशेला स्वयंपाकघर ठेवले होते. का ही चौकशी करा. आपण पूर्वीची दहा घरे पाहिलीत तरी पुरे. त्यातील सहा ते आठ घरांमध्ये आग्नेय दिशेला स्वयंपाकघर नसलेले आढळेल. दोन किंवा तीन घरांमध्ये आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असलेले सापडेल. म्हणजे सर्व पूर्वज आपल्या घरातील स्वयंपाकघर आग्नेय दिशेला ठेवत नव्हते हे तुमच्या लक्षात येईल. गेल्या २०-३० वर्षांमधे आताच्या वास्तुपंडितांनी लिहिलेल्या पुस्तकांच्यामुळे आपण सर्व आग्नेय दिशेला स्वयंपाकघर ठेऊ लागलो आहोत.
एक वेळ आग्नेय दिशेला स्वयंपाकघर नसले तरी तुम्हाला त्याने कसलाही त्रास होणार नाही हा वैज्ञानिक भरवसा द्यायला मी तयार आहे. शिवाय अशी अनेक घरे तुम्हाला दाखवीन. वास्तुशास्त्रच्या पुस्तकात स्वयंपाक करताना पूर्व दिशेला तोंड करावे असे लिहिलेले असते. इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वयंपाक करत असलेल्या गॅस-शेगडीची दिशा फार महत्त्वाची आहे. स्वयंपाक करताना गॅस-शेगडी महत्त्वाची का आपले तोंड महत्त्वाचे असा माझा प्रश्न आहे. गॅस-शेगडी सुरु नाही झाली तर आपले तोंड कोणत्याही दिशेला असून काय उपयोग? आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे स्वयंपाक घरात ठेवलेल्या गॅस-शेगडीची दिशा पाहूनच सरलवास्तू तर्फे त्या घरात आरोग्याची कुरकुर आहे की नाही हे निश्चितपणे सांगू शकेन. शिवाय त्यामुळे तुम्हाला कोणत्या तरी कामात वाईट अनुभव येऊ शकतील. जेव्हा आम्ही स्वयंपाकघर पाहून त्याबद्दल जे काही सांगितले आहे ते कोणीही आतापर्यंत नाकारलेले नाही. त्यामुळे कृपाकरुन आपल्या घरी आग्नेय दिशेला स्वयंपाकघर नाही म्हणून घाबरायचे मुळीच कारण नाही. याचे एक उदाहरण द्यायचे झाले तर बागलकोटमध्ये आमच्या आजोबांनी बांधलेले चोवीस खोल्यांचे घर आहे. त्या घरातही आग्नेय दिशेला स्वयंपाकघर नाही. तरी त्या घरांमध्ये माझे वडील, आजोबा यांनी उत्तम रितीने जगून, बर्यांपैकी पैसा कमावला. आजही ते घर पाहता येईल.