लोकांना आणि आजच्या वास्तुतज्ञांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो.
जे कोण भाड्याच्या घरात किंवा भाड्याच्या वास्तुत व्यवसाय करतात त्यांची भरभराट झाली नाही का?
या प्रश्नाचे कोणाला तरी उत्तर देणे शक्य आहे का? तुम्हीच जरा शांत चित्ताने बसून विचार करा – तुमच्या मित्र परिवारात किंवा नातेवाईकांमध्ये भाड्याच्या घरात राहून भरभराट झालेले लोक नाहीत का? थोडा विचार केलात तर तुमच्या नजरेसमोर स्पष्ट चित्र उमटेल. कितीतरी लोकांनी भाड्याचे दुकान, हॉटेल घेऊन पैसे कमावून स्वत:चे घर बांधले नाही का? म्हणूनच या विषयाबद्दल तुम्हीच विचार करून पाहा.