मी आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला जन्म तारखेप्रमाणे चार चांगल्या दिशा व चार वाईट दिशा असतात. हे विद्यार्थांनाही लागू पडते. विद्यार्थ्यांनी आपल्याला लाभणार्या चांगल्या दिशेला तोंड करुन अभ्यास केला तर त्यांची एकाग्रता वाढून परीक्षेत उत्तम गुण मिळवू शकतात. याच्या जोडीला घरातील सरस्वतीच्या स्थानात काही त्रास नसावा. घरात जर सरस्वतीच्या स्थानात त्रास असेल तर त्या घरी कोणीही अभ्यासात प्रगती करणे शक्य नाही.
अनेक कॉलेजामंध्ये मी विद्यार्थांसाठीच विशेषत व्याख्याने दिली आहेत. आतापर्यंत हजारो विद्यार्थांनी सरळ वास्तुच्या उपाय योजना अंमलात आपल्यामुळे आपल्या विद्यार्थी जीवनात भरभरुन यश मिळवले व पुढे यशस्वी जीवन जगले अशी खूप उदाहरणे आहेत. वाचकांना आणखीन सविस्तर माहिती जाणून घ्यायची असल्यास संस्थेच्या कार्यालयातून मिळवता येईल.
मी एकदा बंगळूरमध्ये व्याख्यान देत असताना एका मुलाने सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्याला चांगल्या असलेल्या दिशेचा घरी वापर करता येईल, पण परिक्षेच्या खोलीत त्याचा वापर करणे कसे शक्य आहे, असा प्रश्न विचारला. त्याचे उत्तर खालच्या चित्राद्वारे सांगतो.
चित्र १
चित्र १ मध्ये दाखवल्याप्रमाणे विद्यार्थ्याचे परीक्षेचे टेबल उत्तराभिमुख असताना
चित्र २
तो विद्यार्थी सरळ बसला तर उत्तर दिशेला तोंड करुन बसल्यासारखे होईल.
चित्र २ मध्ये दाखवल्याप्रमाणे एकवेळ उत्तर दिशा त्या विद्यार्थांच्या वाईटदिशापैकी असेल तर तो बसल्या ठिकाणीच थोडे उजव्या बाजूला तोंड करुन बसलातर तो ईशान्य दिशेला तोंड करुन बसल्यासारखे होईल.
चित्र ३
चित्र ३ मध्ये दाखवल्याप्रमाणे विद्यार्थ्याला उत्तर दिशा वाईट दिशापैकी असले तर तो बसल्या ठिकाणीच थोडे डाव्या बाजूला तोंड करुन बसला तर वायव्य दिशेला तोंड करुन बसल्यासारखे होईल.