वास्तुशास्त्र ही अंधश्रध्दा नव्हे. ही एक वैज्ञानिकतेच्या भक्कम पायावर उभी असलेली कला आहे. सरळ वास्तु म्हणजे माणूस भोवतालच्या वातावरणाशी समरस होऊन जगण्याची एक कला आहे. आणखी खोलवर विचार केला तर वातावरणात नेहमी ऊर्जा (एनर्जी) पसरलेली असते हे लक्षात येईल. या शक्ति चे दोन भाग करता येतात. एक धनात्मक ऊर्जा आणि दुसरी ऋणात्मक ऊर्जा. ऋणात्मक ऊर्जा कमी करुन धनात्मक ऊर्जा वाढविण्याचे प्रकार आणि घरातील सर्व जागेचे विश्लेशन करुन छोटे बदल करण्याच्या पध्दतीलाच सरळ वास्तुशास्त्र म्हणतात. यामुळे सुख व समाधानाने जगता येते. या शक्तिबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगणार आहे.