व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात, व्यवसाय चालविताना आणि घर चालविताना सर्जनशीलता किती महत्त्वाची आहे ? सर्जनशीलता ही रोजच्या जीवनात महत्त्वाची आहे आणि जीवन जगण्याचा तो एक मार्ग आहे. रोजच्या जीवनातील कार्यांमध्ये रचनात्मकता पूर्णपणे बिंबविली गेली आहे आणि साध्या साध्या प्रसंगांमधून ती एकदम वेगळ्या प्रकारे व्यक्त होत असते. सर्जनशीलता म्हणजे काहीतरी तयार करण्याबद्दल नाही तर विकसित होण्याबद्दल आहे. सर्जनशील लोकांना वाटते की संपूर्ण जग आणि त्यांच्यातील आजूबाजूचे सर्वकाही कार्यरत आहे आणि ऊर्जेने भरलेले आहे. मनुष्य प्राण्यांचा जन्मच सर्जनशील म्हणून झाला आहे आणि त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून लहान मुलांमध्ये पाहू शकतो. लहान मुले अतिशय नावीन्यपूर्ण असतात. सर्जनशीलतेमुळे अडथळे दूर होण्यास मदत होते जसे कलात्मक लोक अडथळ्यांना संधी म्हणून बघतात. आजच्या जगात तुम्ही एखाद्या संघटनेचे मालक आहात आणि तुम्ही जर तितकेसे सृजनशील नसाल तर त्याचा अर्थ म्हणजे तुमच्या व्यवसायाचा शेवट होऊ शकतो. अशी बरीच उदाहरणे आहेत जी उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ गुगल. या कंपनीने नाविन्यपूर्णता हा अत्यंत महत्त्वाचा मंत्र बनविला आणि आपल्या सगळ्या प्रतिस्पर्ध्यांना कालबाह्य केले. आपल्या रोजच्या जीवनात जर पति आणि पत्नी दोघांनी मिळून जर काही नवीन केले नाही तर त्यांचे जीवन कंटाळवाणे होईल.