जीवन समस्या मुक्ति ग्राम अभियान (JSMGA) हा एक मोठ्या प्रमाणावर उच्च परिणामकारक सामाजिक उपक्रम आहे. ज्याची कल्पना आणि सुरुवात गुरुजींनी मानवजातीच्या कल्याणासाठी केली आहे. ‘जीवन समस्या मुक्ति ग्राम अभियान’, अंतर्गत गुरुजींनी गाव दत्तक कार्यक्रम सुरू केला आहे, जिथे गावातील प्रत्येक घरात सरळ वास्तुची सेवा देण्यात येते.
(JSMGA) चा हेतू “मानव अभिवृद्धी” हा आहे आणि लोकांमध्ये आणि समाजात मोठ्या प्रमाणात याची जागरूकता वाढविणे हा आहे. हे संपूर्ण गावकऱ्यांच्या जीवनाच्या विविध टप्प्यात जसे शिक्षण, नोकरी नातेसंबंध, व्यवसाय, संपत्ती आणि आरोग्य तसेच त्यांच्या संपूर्ण राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी मदत करते.
भारत सरकारचे शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य साध्य करण्याचे धोरण म्हणून, शासनाने वेगवेगळ्या भागात शेती बद्दल माहिती आणि बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची वाटप केली आहे. सरकारचे सर्व हेतू योग्य असूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या प्रमाणामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत आर्थिक तणाव वाढत आहे.