किती तरी लोक राहत्या घराच्या आवारातील फाटक तोडून ईशान्य दिशेच्या कोपर्यात घालतात. याचे कारण काय अशी चौकशी केली तर वास्तुशास्त्राच्या पुस्तकांमध्ये ईशान्य कोपर्यात फाटक असलेले चांगले असे लिहिले आहे असे सांगतात. मागच्या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे त्याच दिशेला असलेले आवारातील फाटक काढून ईशान्य दिशेला लावले तरी ते ईशान्य दिशेचे होत नाही. ते पूर्वी असलेले फाटक होते. ती पूर्व दिशा असेल किंवा उत्तर दिशा असेल. घराचा मुख्य दरवाजा आणि आवारातील फाटक हे एका सरल रेषेत असू नये हे मी आवर्जून सांगतो. कारण प्रबल शक्ति (एनर्जी) वेगाने घरात घुसते. त्यामुळे घरात राहाणार्यांना नक्कीच त्रास होईल.