दक्षिण-पश्चिम शयनकक्ष
प्रचलित वास्तुशास्त्राप्रमाणे घराच्या यजमानांचे शयनगृह म्हणजे झोपण्याची खोली नैऋत्य दिशेला असणे चांगले हे आम्ही मान्य करतो. परंतु सरळ वास्तुप्रमाणे तसे नसेल तर तोड-फोड करण्याची गरज नाही. झोपण्याच्या खोलीत कोणत्याही प्रकारचे नको ते सामान ठेऊ नये. तसेच झोपण्याच्या खोलीत शौचालय नसले तर फार चांगले. कारण तुम्ही दोन-तीन वेळा शौचालय वापरता तेव्हा तेथे तयार झालेली ऋणात्मक शक्ति झोपण्याच्या खोलीत पसरते. तीच शक्ति आपण झोपलेले असताना घेत असल्यामुळे त्याचे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. त्याचप्रमाणे झोपण्याच्या खोलीतील प्रत्येक आरसा रात्री झोपताना पडद्याने झाकावा.
आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. झोपण्याच्या खोलीत उग्र देव-देवतांचे फोटो व युध्दा संबंधित चित्र लावू नयेत. पाणी असलेले चित्र. पेंटिंग किंवा एक्वरियम ठेऊ नये. झोपण्याच्या खोलीत शांत वातावरण निर्माण करायला मदत करणारी निसर्गचित्र किंवा पक्षीयुगल, राधा-कृष्ण, शिव-पार्वती अशा मूर्ती किंवा चित्र ठेऊ शकता. नैऋत्य दिशेला झोपण्याची खोली नसली तरी घाबरण्याचे कारण नाही.