विशुध्द चक्र ( त्याला विशुध्दी चक्र अथवा कंठ चक्र म्हणून ओळखले जाते. ) मानवी शरीरातील है पाचवे प्राथमिक चक्र आहे. विशुध्द हा संस्कृत शब्द आहे ज्याच्या अर्थ आहे शुध्द करणे अथवा स्वच्छ करणे आणि ही स्वच्छता फक्त शारीरिक स्तरावर नसून आत्मा आणि मनाची सुध्दा असल्याचे दर्शविते. आत्म्यातून सत्य व्यक्त करणे हाच याचा मुख्य उद्देश आहे. हे चक्र दळणवळण तसेच वक्तव्याचे केंद्र आहे आणि श्रवण शक्ति व ऐकणे या गोष्टी कंठ चक्राने नियंत्रित केल्या जातात. यामुळे व्यक्तीला संवाद करण्याचा तसेच निवड करण्याचा अधिकार मिळतो.

प्रतिकात्मक रूपात हे चक्र कमळाच्या सोळा पाकळ्यांनी दर्शविले जाते ज्यामध्ये प्रत्येक पाकळी ही व्यक्तीला संभवतः श्रेष्ठत्व प्राप्त होऊ शकते अशा सोळा वैशिष्ट्यांचे प्रतिनिधित्व करते. ( सोळा पाकळ्या ह्या संस्कृतच्या सोळा स्वरांचे प्रतिनिधित्व करतात. ) याचा मंत्र ` हम ‘ आणि रंग निळा आहे.

विशुध्द चक्राचे स्थान

विशुध्द चक्र गळ्याच्या दिशेने उघडते आणि तिसऱ्या व पाचव्या मानेच्या मणक्यांमध्ये स्थित असते.

विशुध्द चक्राशी संबंधित अवयव तसेच आजार –

विशुध्द चक्र मुख्यतः तोंड, दात, जबडा, घसा, मान, अन्ननलिका, थायरॉईड ग्रंथी आणि मणक्यांचे कार्य नियंत्रित करते.

घसा खवखवणे, कानात इन्फेक्शन होणे, पाठ आणि मानेमध्ये दुखणे, थायरॉईडचे विकार, दात तसेच हिरड्यांच्या समस्या या कंठ चक्रामुळे होणाऱ्या काही शारीरिक समस्या आहे. निष्क्रिय कंठ चक्रामुळे होणाऱ्या मानसिक आणि भावनिक मनस्तापांमध्ये दुर्बल संवाद, दुर्बल श्रोता आणि तोतरे बोलणे, कमकुवत आवाज तसेच ओरडून व अधिकारवाणीने बोलणे अशा समस्या येऊ शकतात.

अवरूध्द तसेच असंतुलित विशुध्द चक्रामुळे येणाऱ्या समस्या –
  • अति सक्रिय विशुध्द चक्र –
    अति सक्रिय विशुध्द चक्रामुळे व्यक्ती बोलताना ओरडून बोलतो किंवा कोणी बोलण्याच्या आधी अथवा कोणाचे ऐकून घ्यायच्या आधीच ते ओरडून अधिकारवाणीने बोलतात. त्यांचा आवाज मोठा किंवा कर्कश्य असतो आणि ते इतरांच्या बाबतीत स्वतःचे मत बनवितात तसेच गोष्टींचे अति विश्लेषण करतात.
  • निम्न सक्रिय विशुध्द चक्र –
    ज्या व्यक्ति कुजबुजतात, लाजाळूपणे किंवा तोतरे बोलतात त्यांचे कंठ चक्र निम्न सक्रिय असते. अशा लोकांना संभाषण करणे कठीण जाते तसेच बोलताना योग्य शब्दांचा उपयोग करून बोलणे अवघड जाते.
संतुलित विशुध्द चक्रामुळे होणारे लाभ –

कंठ चक्र संतुलित असल्यामुळे लोकांच्या आवाजात अनुनादासहित सुस्पष्टता तसेच आवाजातील स्वच्छपणा व लयबध्दता भिनविली जाते.

विशुध्द चक्र उघडणे –
  • विशुध्द चक्रामुळे विचारांचे आदान प्रदान नियंत्रित केले जाते म्हणून सत्य बोलणे किंवा दुसऱ्यांचे विचार व मते व्यक्त करण्याने हे चक्र उघडले जाते. व्यक्ती आपल्या अंर्तमनातील भावना व्यक्त करण्यासाठी आणि स्वतःचे वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी डायरी ठेवू शकतो.
  • जप करणे किंवा गायन ( किंवा इतर कलात्मक व सर्जनशील गोष्टी करण्याने जसे की चित्र काढणे अथवा कलाकृती बनविणे ) करण्याने विशुध्द चक्र उघडले जाऊ शकते.
  • अवरूध्द तसेच असंतुलित विशुध्द चक्र ध्वनी, मंत्र तसेच रंगांमुळे उघडले जाऊ शकते. दुसऱ्या पध्दतीने विशुध्द चक्र उघडण्यासाठी ध्यान धारणा करताना या चक्रासाठी सकारात्मक विचार तसेच निळ्या रंगाची कल्पना करावी. निळ्या आकाशाखाली शांतपणे बसून अथवा निळ्याशार समुद्राच्या किंवा सरोवराच्या पाण्यासमोर बसून पाचव्या चक्रावर लक्ष केंद्रित करावे.
  • अक्वामरीन, निळा टर्मलाईन, लापीस लाझुली, नीलमणी इत्यादि सहित कंठ चक्राला संतुलित करण्यासाठी निळ्या रत्नांचा व खड्यांचा उपयोग केला जाऊ शकतो.
  • जरी अवरूध्द चक्रामुळे सगळ्यांवर प्रभाव पडतो असला तरीही विद्यार्थ्यांना विशुध्द चक्र उघडण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज असते. विद्यार्थ्यांची खोली नेहमी वास्तु शास्रा अनुरूप असली पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना त्यांच्या / तिच्या अनुकूल दिशेचा सामना करून बसले पाहिजे.
  • ज्या फळे, भाज्या तसेच ज्युसेस् आदि मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते अशा खाद्य पदार्थांमुळे विशुध्द चक्र उघडले जाते.
  • सुगंधी चिकित्सेच्या उपायांमध्ये चंदन, गुलाब, येलांग-येलांग इत्यादी आवश्यक तेलांचा ध्यानधारणा तसेच अभ्यास करताना विशुध्द चक्राच्या ठिकाणावर मालिश केले जाऊ शकते.