देवी लक्ष्मी ही ऐश्वर्य आणि समृध्दीची देवता आहे आणि या देवतेची पूजा केल्याने भक्तांना चांगले भाग्य प्राप्त होते. संपत्ती आणि समृध्दी म्हणजेच भौतिक व आध्यात्मिक असे दोन्ही लाभ होते. शुभ लक्ष्मी ही देवता बहुतेक सगळ्या घरांमध्ये आणि कार्यालयांमध्ये रोज पूजनीय आहे व जास्त करून महिलांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. दिवाळीचे वैशिष्ट्य दिवाळीच्या मुख्य दिवशी देवी लक्ष्मीची उपासना करणे हे आहे आणि या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राची रात्र असते. या दिवसाच्या महत्त्वामुळे पूजेच्या खोलीसाठी वास्तू शास्र चे अनुकरण करणे आवश्यक आहे तसेच वास्तू शास्राला अनुसरून पूजेच्या खोलीला सुशोभित करणेही आवश्यक आहे. लक्ष्मी देवतेची उपासना करताना फक्त योग्य मंत्रांचे उच्चारण करणे आणि योग्य पूजेची सामग्री असणे हे समाविष्ट नसून पूजेची खोली वास्तूप्रमाणे परिपूर्ण करणे ही एक गोष्ट प्रत्येक भक्तांनी आचरणात आणली पाहिजे.
पूजेच्या खोलीसाठी वास्तू शास्रास समजावून घेणे आणि जरूरी असे बदल घडून आणल्याने पूजेच्या खोलीतून उत्पन्न होणारी सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घराला किंवा कार्यालयाच्या परिसराला आशिर्वाद देऊन सुखी आणि समृध्द बनवितात. देवी लक्ष्मीला देवतांची माता आणि सर्वोच्च अलौकिक शक्ती असलेल्या स्री ऊर्जेचा महान स्रोत म्हणून संबोधले जाते. म्हणून तिची उपासना केली पाहिजे आणि देवी लक्ष्मीचे स्वागत शुध्द अशा अपरिवर्तित पूजेच्या खोलीत केले पाहिजे.
असे मानले जाते की, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जे लक्ष्मीची पूजा उपासना करतात त्यांच्या घरी देवी लक्ष्मी येऊन ऐश्वर्य, सौभाग्य आणि समृध्दीचा आशिर्वाद देते. दिवाळी अमावस्येच्या दिवशी येते पण जर स्वच्छ आणि वास्तू परिपूर्ण घरात देवीची मनोभावे पूजा व उपासना केली तर व्यक्तीच्या जीवनातील दिवस अतिशय प्रसन्न होतील हे देवी लक्ष्मी सुनिश्चित करते. दिवाळी सोडून इतर दिवसांत केलेल्या प्रार्थनेपेक्षा दिवाळीच्या मुख्य दिवशी जर प्रार्थना केली तर त्याचा दुप्पट फायदा होतो असा विश्वास आहे. देवीच्या भक्तांचा विश्वास आहे की, दिवाळीच्या दिवशी योग्य मुहूर्तावर शुभ लक्ष्मीची पूजा केल्याने पूर्ण वर्षभर त्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येतो. म्हणून, दिवाळीच्या सणात घराची स्वच्छता करताना आणि घराची सजावट करताना वास्तू शास्राच्या सिध्दांतांचे अनुसरण केल्यामुळे खात्रीने सकारात्मक परिणामांचे आगमन होते. शुभ लक्ष्मीची आराधना करणे म्हणजेच संपत्तीचे व्य़वस्थापन करण्यासारखे आहे अशी प्राचीन परंपरा जपणा र््या अतिशय उत्साही भक्तांनी दिलेली टीप आहे.
- स्वच्छता ठेवणे हा वास्तूमध्ये नमूद केलेला एक मुख्य महत्त्वाचा विचार आहे. घर स्वच्छ असल्याने न केवळ देवी देवता प्रसन्न असतात पण सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मकतेचा सुध्दा वावर असतो. दिवाळी सजावटीचा एक भाग म्हणून पूर्ण घर स्वच्छ करा विशेषतः दारे आणि खिडक्यांची स्वच्छता केंद्रस्थानी ठेवा.
- घराच्या सजावटीत फर्निचरला हलविणे आणि त्यांना नवीन जागी ठेवणे अंतर्भूत होते. वास्तूच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे फर्निचरला नवीन जागी ठेवले जाईल हे सुनिश्चित करा. केलेल्या छोट्याशा बदलांमुळे ऐश्वर्याच्या प्रवाहामध्ये मोठे परिणाम दिसून येतात.
- वास्तू शास्रात उल्लेख केल्याप्रमाणे योग्य दिशांना देवी देवतांच्या मूर्ती आणि प्रतिमांना पुनःव्यवस्थित सजवून ठेवा.
- पूजेच्या खोलीला अति लाल प्रकाशाने सजविणे टाळा. जास्त लाल दिव्यांच्या प्रकाशामुळे नकारात्मक प्रभाव पडतो. कार्यालयात हिरवा प्रकाश देणारे बल्ब व घरामध्ये पिवळ्या रंगाचा प्रकाश देणारे दिवे वापरा.
लक्ष्मीपूजनाला सुरूवात करण्यापूर्वी देवी लक्ष्मीची मूर्ती योग्य दिशेत ठेवा. शिवाय लक्ष्मी पूजन करताना भक्ताने कोणत्या दिशेला तोंड करून बसावे हे जाणून घेण्यासाठी प्रख्यात वास्तू सल्लागाराच्या संपर्कात रहा. असे बरेच वास्तू शास्राचे सिध्दांत आहेत ज्यांचे दिवाळीत आचरण करणे आवश्यक आहे आणि यासाठी तज्ज्ञांचा विचार घेणे योग्य आहे.